सुनील केदार यांच्या जामीनावर हायकोर्टात ९ जानेवारीला सुनावणी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या रोखे घोटाळा प्रकरणी 5 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. ३) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत ६ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या ९ … The post सुनील केदार यांच्या जामीनावर हायकोर्टात ९ जानेवारीला सुनावणी appeared first on पुढारी.

सुनील केदार यांच्या जामीनावर हायकोर्टात ९ जानेवारीला सुनावणी

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 153 कोटी रुपयांच्या रोखे घोटाळा प्रकरणी 5 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि. ३) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत ६ जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या ९ जानेवारीला होणार आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 153 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात जेएमएफसी कोर्टाने २२ डिसेंबर रोजी केदार यांना दोषी ठरवत पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची,12.5 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज व शिक्षेला स्थगिती बाबत अर्ज फेटाळल्यावर केदार यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात उत्तर सादर झाल्यावर ९ जानेवारी रोजी केदार यांच्या जामीनावर सुनावणी होऊ शकणार आहे. तोवर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सुनील केदार यांचा मुक्काम मध्यवर्ती कारागृहातच राहणार आहे.
Latest Marathi News सुनील केदार यांच्या जामीनावर हायकोर्टात ९ जानेवारीला सुनावणी Brought to You By : Bharat Live News Media.