Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : द. आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील पहिला डाव भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारतीय गोलंदाजीसमोर आफ्रिकन फलंदाजांनवी लोटांगण घातले. आपल्या भेदक माऱ्यात मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा बळी घेतले. या माऱ्यात आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांत गुंडाळला. गोलंदाजीमध्ये सिराजला सहकारी गोलंदाजांनी मोलाची साथ दिली. यामध्ये जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. फलंदाजीमध्ये आफ्रिकेकडून काइल व्हेरेने सर्वाधिक 15 धावा केल्या. (IND vs SA Test)
सिराज वादळासमोर द. आफ्रिकेचे लोटांगण, विकेटचा षटकार
द. आफ्रिकेविरूद्ध केपटाऊन येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या भेदक माऱ्यात सहा विकेट घेतल्या. यामध्ये डीन एल्गर (4), टोन डे झोरजी (2), ट्रिस्टन स्टब्स (3), डेव्हिड बेडिंगहम (12), मार्को जानेसेन (0), यांना बाद केले. (IND vs SA Test)
केवळ दोघांना गाठता आला धावांचा दुहेरी आकडा
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे एकाही आफ्रिकन फलंदाजाला 20 धावा करता आल्या नाहीत. यामध्ये काइल व्हेरेनेने सर्वाधिक 15 धावा केल्या. त्याच्यासह डेव्हिड 12 धावाकरून बाद झाला. यांच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 10हून अधिक धावा करता आल्या नाहीत.
2ND Test. WICKET! 23.2: Kagiso Rabada 5(13) ct Shreyas Iyer b Mukesh Kumar, South Africa 55 all out https://t.co/PVJRWPfGBE #SAvIND
— BCCI (@BCCI) January 3, 2024
हेही वाचा :
Mohammed Siraj : 15 धावांत 6 विकेट्स, सिराजपुढे द. आफ्रिकेची शरणागती
Sunil Kedar : सुनील केदार यांच्या जामीनावर हायकोर्टात ९ जानेवारीला सुनावणी
Nashik News : अवैध शस्त्रसाठा बाळगणारे पोलिसांच्या ताब्यात, नांदगाव पोलिसांची कारवाई
Latest Marathi News ‘सिराज’ वादळात द. आफ्रिका भुईसपाट, 55 धावांत पहिला डाव गुंडाळला Brought to You By : Bharat Live News Media.