न्या. संदीप शिंदे समिती 28 रोजी कोल्हापूर दौर्यावर
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली आहे. ही समिती मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर दौर्यावर येत आहे. कोल्हापूर दौर्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा समिती आढावा घेणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकार्यांकडून समिती माहिती घेणार आहे. या दोन्ही जिल्ह्यांत कुणबी प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या कामकाजाचे यावेळी सादरीकरण केले जाणार आहे. यानंतर समिती पुण्याला रवाना होणार आहे.
जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात तब्बल 14 हजारांहून अधिक नोंदी शोधण्यात आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात 7 हजार 800 हून अधिक जणांना कुणबी दाखले देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची माहिती संकलित केली जात आहे. त्याचबरोबर कुणबी नोंद शोधमोहीमही सुरू आहे.
The post न्या. संदीप शिंदे समिती 28 रोजी कोल्हापूर दौर्यावर appeared first on पुढारी.
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती स्थापन केली आहे. ही समिती मंगळवारी (दि. 28) कोल्हापूर दौर्यावर येत आहे. कोल्हापूर दौर्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा समिती आढावा घेणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 28) सकाळी साडेदहा वाजता कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकार्यांकडून …
The post न्या. संदीप शिंदे समिती 28 रोजी कोल्हापूर दौर्यावर appeared first on पुढारी.