चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : मोहम्मद शमीची विभक्त पत्नी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या आक्रमक माऱ्याच्या जोरावर भारताला विजय मिळवून देत आहे. त्याने विश्वचषकात आत्तापर्यंत २३ विकेट्स पटकावल्या आहेत. एकीकडे शमी चांगली कामगिरी करत असताना त्याची विभक्त झालेली पत्नी त्याच्यावर टीका करताना दिसत आहे. तो खेळाडू म्हणून जसा चांगला आहे, त्याप्रमाणे त्याने माणूस बनून दाखवावे, अशी इच्छा मोहम्मद … The post चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : मोहम्मद शमीची विभक्त पत्नी appeared first on पुढारी.

चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : मोहम्मद शमीची विभक्त पत्नी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या आक्रमक माऱ्याच्या जोरावर भारताला विजय मिळवून देत आहे. त्याने विश्वचषकात आत्तापर्यंत २३ विकेट्स पटकावल्या आहेत. एकीकडे शमी चांगली कामगिरी करत असताना त्याची विभक्त झालेली पत्नी त्याच्यावर टीका करताना दिसत आहे.
तो खेळाडू म्हणून जसा चांगला आहे, त्याप्रमाणे त्याने माणूस बनून दाखवावे, अशी इच्छा मोहम्मद शमीची विभक्त पत्नी हसीन जहान हिने व्यक्त केली आहे. शमीवर पत्नी जहान हिने घरगुती हिंसाचार आणि व्याभिचाराचे आरोप केले होते. त्यानंतर २०१८ पासून दोघे विभक्त झाले.
हसीन जहान म्हणाली, “शमीच्या चुकांमुळे, लोभांमुळे आम्हा तिघांना वाईट परिणाम भोगावे लागले आहेत. तो पैशाच्या माध्यमातून नकारात्मक मुद्दे लपविण्याचा प्रयत्न करत आहे.” शमीने न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात ७ विकेट्स घेऊन अनेक विक्रम मोडीत काढले. त्याच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया विचारली असता हसीन जहान म्हणाली, “मला काही विशेष वाटत नाही. पण भारताने उपांत्य फेरीचा सामना जिंकला हे चांगले वाटले. भारताने फायनलही जिंकावी अशी मी प्रार्थना करते.”

‘Wish he were as good a husband, father too’: Mohd Shami’s estranged wife on his 7-wicket haul against NZ https://t.co/lNWuGycUoT
— Business Today (@business_today) November 17, 2023

हेही वाचलंत का?

Jarange Patil : ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार तयार’, जरांगे पाटील यांचे कोल्हापुरात सभेत एकजुटीचे आवाहन
Maratha Reservation: हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी नवा कायदा?; राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रतीक्षा

The post चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : मोहम्मद शमीची विभक्त पत्नी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी त्याच्या आक्रमक माऱ्याच्या जोरावर भारताला विजय मिळवून देत आहे. त्याने विश्वचषकात आत्तापर्यंत २३ विकेट्स पटकावल्या आहेत. एकीकडे शमी चांगली कामगिरी करत असताना त्याची विभक्त झालेली पत्नी त्याच्यावर टीका करताना दिसत आहे. तो खेळाडू म्हणून जसा चांगला आहे, त्याप्रमाणे त्याने माणूस बनून दाखवावे, अशी इच्छा मोहम्मद …

The post चांगला खेळाडू आहे, त्याप्रमाणे त्याने चांगला माणूसही बनावे : मोहम्मद शमीची विभक्त पत्नी appeared first on पुढारी.

Go to Source