जळगाव : वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज ( दि. ३१) सकाळी कुसुंबे  (जि.जळगाव) येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वीर … The post जळगाव : वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

जळगाव : वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज ( दि. ३१) सकाळी कुसुंबे  (जि.जळगाव) येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भानुदास पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करत श्रध्दांजली वाहिली. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनीही वीर जवान भानुदास पाटील यांच्या घरी सांत्वनपर भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप दिला. Jalgaon News
भारतीय सैन्य दलातील भुज‌ येथील १२४९ डीएससी (डिफेन्स सेक्युरिटी कॅम्प) प्लाटून ७५ इन्फेंन्ट्री ब्रिगेड येथे ते सेवारत होते. कर्तव्य बजावत असताना जवान भानुदास पाटील (वय ५५) यांचा शनिवारी (दि. ३०) आकस्मिक मृत्यू झाला. दरम्यान, कुंसुबे गावावर शोककळा पसरली होती. त्यांचे पार्थिव आज सकाळी कुसुंबे येथे आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेवून ‘अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान भानुदास पाटील अमर रहे’ सह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. Jalgaon News
वीर जवान भानुदास पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसीलदार अर्पीत चव्हाण, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डिफेन्स सेक्युरिटी कॅम्पचे सुभेदार अवतार सिंह, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे हवालदार रतिलाल महाजन, लक्ष्मण मनोरे व सुगंध पाटील, सरपंच यमुना ठाकरे, पोलीस पाटील राधेश्याम चौधरी आदीसह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले.पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्य दल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा सचिन यांनी मुखाग्नी दिला. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी, तीन भाऊ व तीन बहिणी असा परिवार आहे. यावेळी वीर जवान भानुदास पाटील यांचे कुटुंबीय, सैन्य दलाचे अधिकारी, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :

‘रिंगमास्टर’च्या तालावर नाचणारा वाघ : कोल्हे यांची अजित पवारांवर टीका
राज्यात २२ जानेवारीला दीड लक्ष मंदिरात होणार दिवाळी साजरी : बावनकुळे
सरकार युवकांच्या तोंडचा घास पळवतंय, अनिल देशमुखांचा आरोप

Latest Marathi News जळगाव : वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Brought to You By : Bharat Live News Media.