सरकार भूमिका बदलतंय, पण आता माघार नाही: जरांगे-पाटील
वडीगोद्री, Bharat Live News Media वृत्तसेवा: सरकार पावला-पावलावर आपली भूमिका बदलत असल्याने आम्ही २० जानेवारीला मुंबईला चाललो आहोत. या आंदोलनावेळी एकाही मराठयाने घरी थांबू नये. आता ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यांनी आज (दि.३१) अंतरवाली सराटीत पत्रकारांशी संवाद साधला. Manoj Jarange Patil
मराठा समाजाला आरक्षण मिळायला उशीर होईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या मनातलंच सांगितले आहे. पण आम्ही ते आरक्षण मगितलेलंच नाही. आमची मागणी ही मराठा-कुणबी एकच असल्याने मराठयांना ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची आहे. २०२३ या चालू वर्षात मी समाजाला कमावले आहे. या वर्षात काहीही गमावले नाही. समाज एकसंघ व संघटित झाल्याने निर्णायक वळणावर हे आंदोलन आले आहे. Manoj Jarange Patil
चंद्रकांत पाटील असल्यानंतर नक्कीच पन्नास वर्षे आरक्षणासाठी लागतील, असा टोलाही जरांगे यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील आता खरं बोलले आहेत. आमची विशेष अधिवेशनाची मागणी नाही, आधी सुरू असलेल्या अधिवेशनाची मुदत वाढवा, अशी मागणी आम्ही केली होती, असे ही जरांगे यांनी स्पष्ट केले. आरक्षण मिळण्यासाठी म्हणून उपोषणापेक्षा दुसरे शांततेतील आंदोलन कुठले असेल, तर ते सरकारने सांगावे, असे जरांगे यांनी म्हटले.
मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरे करावे, अशी इच्छाही जरांगे यांनी बोलून दाखवली. दारू पिऊन दुसऱ्यांची दुकाने मोठी करणे बंद करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी मराठा समाजाच्या तरुणांना यावेळी केले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. आमच्या आंदोलनाला सहज न घेता, त्यांनी गांभीर्याने घ्यावे, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. मुंबईतील मराठा समाजाची ३ जानेवारीला अंतरवाली सराटी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्वांनी गट तट विसरून या बैठकीला यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले.
हेही वाचा
Maratha Reservation : मला अडवलं तर फडणवीसांच्या घरासमोर बसू : मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला उद्यापर्यंत अल्टिमेटम
Maratha Reservation : पीएम मोदींनी मराठा आरक्षणावर एकही शब्द काढला नाही : मनोज जरांगे पाटील
Latest Marathi News सरकार भूमिका बदलतंय, पण आता माघार नाही: जरांगे-पाटील Brought to You By : Bharat Live News Media.