हिंगोली: पिकअपचा टायर फुटून अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
सेनगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : सेनगाव- हिंगोली महामार्गावर पिकअप व दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.३०) घडली. विजय अंभोरे व मोहम्मद शेख (रा. भानखेडा, ता. सेनगाव) अशी मृतांची नावे आहेत.
सेनगाव ते हिंगोली महामार्गावरील हॉटेल रायगडजवळ हा अपघात झाला. पिकअपचा टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. दोघांचे मृतदेह सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत.
हिंगोली, सेनगाव, रिसोड या महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी गतिरोधकाची आवश्यकता असताना संपूर्ण रस्त्यावर एकाही ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे भरधाव वेगाने वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या महामार्गावरील शाळा, कॉलेज व खेडेगावात जाणाऱ्या फाट्यावर गतिरोधक बसण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.
हेही वाचा
हिंगोली : तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ कात टाकणार; विकासासाठी १५ कोटींचा निधी मंजूर
हिंगोली: औंढा नागनाथ येथील सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार
हिंगोली : मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरूणाने संपवले जीवन
Latest Marathi News हिंगोली: पिकअपचा टायर फुटून अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.