राहुल गांधींशी पंगा घेणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपकडून मोठे बक्षीस; ‘या’ पदावर लागली वर्णी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पंगा घेणाऱ्या Purnesh Modi यांना मोठे बक्षीस दिले आहे. त्यांची दादरा नगर हवेली आणि दमणच्या राज्य प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे. पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला होता. या खटल्यामुळे राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. पूर्णेश मोदी … The post राहुल गांधींशी पंगा घेणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपकडून मोठे बक्षीस; ‘या’ पदावर लागली वर्णी appeared first on पुढारी.
राहुल गांधींशी पंगा घेणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपकडून मोठे बक्षीस; ‘या’ पदावर लागली वर्णी


पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पंगा घेणाऱ्या Purnesh Modi यांना मोठे बक्षीस दिले आहे. त्यांची दादरा नगर हवेली आणि दमणच्या राज्य प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे. पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला होता. या खटल्यामुळे राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. पूर्णेश मोदी हे यापूर्वी ३ वेळेस आमदार म्हणून निवडूण आले आहेत. ते दक्षिण गुजरातमधील ओबीसी समाजाचा चेहरा मानले जातात. व्यवसायाने ते वकिल देखील आहेत. (Purnesh Modi)
पूर्णेश मोदी हे २०१३ मध्ये सुरत पश्चिम या मतदारसंघातून पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर २०१७ आणि २०२२ मध्ये त्याच जागेवरुन त्यांनी गुजरात विधानसभा गाठली. २०२२ मध्ये ते १ लाखांहून अधिक मतांनी निवडूण आले आहेत. २०२१ मध्ये ते पहिल्यांदा भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले होते. त्यांच्याकडे वाहतूक, पर्यटन आणि तीर्थक्षेत्र विकास यांसारख्या खात्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशाला अनेकांनी आश्चर्यकारक वाटचाल म्हणून पाहिले होते. (Purnesh Modi)

Purnesh Modi, BJP MLA who sued Rahul Gandhi for defamation, gets big post#PurneshModi #News https://t.co/OCjpvNQTkY
— IndiaToday (@IndiaToday) November 17, 2023

हेही वाचलंत का?

Kajol Deepfake Video : रश्मिका अन् कटरिना नंतर आता काजोलचा ‘डीपफेक’ व्हायरल
Maratha Reservation : भुजबळ सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करताहेत : संभाजीराजे छत्रपती
Maratha Reservation: हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी नवा कायदा?; राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रतीक्षा

The post राहुल गांधींशी पंगा घेणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपकडून मोठे बक्षीस; ‘या’ पदावर लागली वर्णी appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी पंगा घेणाऱ्या Purnesh Modi यांना मोठे बक्षीस दिले आहे. त्यांची दादरा नगर हवेली आणि दमणच्या राज्य प्रभारी पदी निवड करण्यात आली आहे. पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहाणीचा खटला दाखल केला होता. या खटल्यामुळे राहुल गांधी यांना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागले होते. पूर्णेश मोदी …

The post राहुल गांधींशी पंगा घेणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपकडून मोठे बक्षीस; ‘या’ पदावर लागली वर्णी appeared first on पुढारी.

Go to Source