संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवा : खा. हिना गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जनजाती गौरव दिन सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी देखील एकाहून एक सरस सादरीकरण आदिवासी नृत्य पथकांनी केले. त्यानंतर उत्तम सादरीकरण करणाऱ्या पथकांना पुरस्कार घोषित होताच सर्व पथकांनी दणकेबाज संगीतावर एकत्रित नृत्य करून एकच जल्लोष केला. त्यांच्या समवेत टी आर टी आय च्या आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ठेका धरून पथकांचा … The post संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवा : खा. हिना गावित appeared first on पुढारी.

संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवा : खा. हिना गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जनजाती गौरव दिन सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी देखील एकाहून एक सरस सादरीकरण आदिवासी नृत्य पथकांनी केले. त्यानंतर उत्तम सादरीकरण करणाऱ्या पथकांना पुरस्कार घोषित होताच सर्व पथकांनी दणकेबाज संगीतावर एकत्रित नृत्य करून एकच जल्लोष केला. त्यांच्या समवेत टी आर टी आय च्या आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ठेका धरून पथकांचा आनंद द्विगुणित केला. दरम्यान याप्रसंगी केलेल्या प्रमुख भाषणात संसदरत्न खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी विकसित भारत संकल्प यात्रा १० दिवस चालणार असल्याची माहिती दिली व शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचवाव्या, असे आवाहन केले.
मागील तीन दिवसापासून चालू असलेल्या जनजाती गौरव दिन सोहळ्याची आज (दि.१७) अत्यंत जल्लोषात सांगता झाली. समारोपाच्या या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित, संसदरत्न डॉ.हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.कुमुदिनी गावित यांच्या हस्ते व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था संचालिका चंचल पाटील, उपसंचालक हेमध्वज सोनवणे, अनु. जात पडताळणी कार्यालयाचे सह आयुक्त सरोदे, गणेश तिडके, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत जी पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी डगळे व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तम सादरीकरण करणाऱ्या नृत्य पथकांना पुरस्कार वितरित करण्यात आले.
यावेळी खासदार गावित म्हणाल्या की, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरातील जनजातींचा गौरव केला जावा, म्हणून पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात जनजाती गौरव दिन साजरा करण्याला सुरुवात केली. यंदा या सोहळ्याचा बहुमान आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याला मिळाला ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. इतक्या देखण्या भव्य सोहळ्याचे आयोजन आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था व महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाने केले आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील आदिवासी कलाकारांना प्रोत्साहन दिले. एका व्यासपीठावर येण्याची संधी दिली, म्हणून आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे आभार मानते. या ठिकाणी 127 स्टाल लागले विविध महिला बचत गटांनी आणि हस्तकला शिवणकला भरतकाम शिल्पकला तसेच खाद्यपदार्थ व औषधी विक्रेत्यांनी त्यांच्याकडील साहित्य सादर केले. बांबू पासून आपणही विविध वस्तू बनवू शकतो विविध वनस्पतींपासून उपयुक्त द्रव्य बनवू शकतो याची माहिती महिलांना मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला. 11 लघुपट गेल्या तीन दिवसात प्रदर्शित झाले. त्यामुळे उपस्थितितांना आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. ही या गौरव दिनाची निष्पत्ती आहे, असे सांगून खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी विकसित भारत संकल्प यात्रा 10 दिवस चालणार असल्याची माहिती दिली व शेवटच्या गरजूपर्यंत केंद्राच्या योजना पोहोचवाव्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पुरस्कार प्राप्त पथक याप्रमाणे:

प्रथम पुरस्कार पारंपारिक आदिवासी ढेमसा नृत्य लोहारा, झरीझामणी, जिल्हा यवतमाळ
द्वितीय पुरस्कार वीर बाबूराव शेडमाके घुसाडी डेमसा नृत्य, पांढरकवडा जिल्हा यवतमाळ
तृतीय पुरस्कार बिरसा मुंडा नृत्य पथक, अहेरी, जिल्हा गडचिरोली, रेला नृत्य
उत्तेजनार्थ पुरस्कार तारपा नृत्य धानिवारी, ता. डहाणू जिल्हा पालघर आणि वरसूबाई ढोलताशा गोफ नृत्य, जुन्नर, जिल्हा पुणे

 
हेही वाचा : 

Purnesh Modi : राहुल गांधींशी पंगा घेणाऱ्या पूर्णेश मोदींना भाजपकडून मोठे बक्षीस; ‘या’ पदावर लागली वर्णी
State Cabinet Meeting | शिक्षण संस्था स्थापन करु शकतात समूह विद्यापीठे, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Delhi : दिल्लीत फसवेगिरीचा रेकॉर्ड, बनावट हॉस्पिटलचा भांडाफोड; डॉक्टर, सर्जन, नर्स, औषधं सगळेच बनावट

 
The post संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवा : खा. हिना गावित appeared first on पुढारी.

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जनजाती गौरव दिन सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी देखील एकाहून एक सरस सादरीकरण आदिवासी नृत्य पथकांनी केले. त्यानंतर उत्तम सादरीकरण करणाऱ्या पथकांना पुरस्कार घोषित होताच सर्व पथकांनी दणकेबाज संगीतावर एकत्रित नृत्य करून एकच जल्लोष केला. त्यांच्या समवेत टी आर टी आय च्या आणि आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ठेका धरून पथकांचा …

The post संकल्प यात्रेच्या माध्यमातून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत योजना पोहोचवा : खा. हिना गावित appeared first on पुढारी.

Go to Source