नाशिक : शिर्डी दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या व्हॅनमध्ये गॅसचा स्फोट; दहाजण जखमी
येवला; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागडदरवाजा भागातील मशीद जवळ अवैधरित्या मारुती व्हॅनमध्ये गॅस भरत असताना दुपारी चारच्या दरम्यान झालेल्या स्फोटामुळे मारुती व्हॅनमध्ये बसलेले मराठवाड्यातील सुमारे दहा प्रवासी भाजले असून यात लहान मुलांचाही समावेश आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डी साई दर्शनासाठी आलेलं कुटुंब नगरसुल रेल्वे स्टेशनवर दाखल झाले होते. यावेळी नगरसुल येथून दुसऱ्या खाजगी वाहनाने ते येवल्यात आले. येवल्यातून शिर्डीसाठी त्यांनी एक मारुती व्हॅन कार भाडोत्री घेतली होती. या कारमध्ये गॅस भरत असताना हा भीषण स्फोट झाला. येवला शहरातील वर्दळीच्या ठिकाण असलेल्या पक्की मज्जिद भागामध्ये ही घटना घडली आहे. यात 10 व्यक्तींचा समावेश असून चार लहान बालके आहेत . जखमींना शहरातील सोनवणे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. यात एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे . जखमी झालेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आदित्य अवचारे वय 11 सीमा कसबे यांचे वय समजू शकले नाही यानंतर प्रदीप अवचारे, वैभव लिंबे (वय 22) विराज कसबे (वय 4) प्रतिभा लिंबे (वय 39) वैदही कसबे (वय 1.5) अनुष्का कसबे (वय 14) आणि गीता कसबे (वय 22) असे एकूण दहा जणांचा समावेश असून यातील एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती सोनवणे हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर आर्यन सोनवणे यांनी दिली आहे. घटनास्थळी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले . यामध्ये माजी आमदार मारुतराव पवार, येवला शहराचे पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, रिजवान भाई, मुश्रीफ शहा यांच्यासह परिसरातील मुस्लिम नागरिकांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत केली आहे.
The post नाशिक : शिर्डी दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या व्हॅनमध्ये गॅसचा स्फोट; दहाजण जखमी appeared first on पुढारी.
येवला; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागडदरवाजा भागातील मशीद जवळ अवैधरित्या मारुती व्हॅनमध्ये गॅस भरत असताना दुपारी चारच्या दरम्यान झालेल्या स्फोटामुळे मारुती व्हॅनमध्ये बसलेले मराठवाड्यातील सुमारे दहा प्रवासी भाजले असून यात लहान मुलांचाही समावेश आहे. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी (दि. 17 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डी साई दर्शनासाठी आलेलं …
The post नाशिक : शिर्डी दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबाच्या व्हॅनमध्ये गॅसचा स्फोट; दहाजण जखमी appeared first on पुढारी.