तडका : राम राम मंडळी..!

राम राम मंडळी, राम राम. तुमास्नी सांगतो आमच्या गावात जवळपास चाळीस राम हैत. सखाराम, तुकाराम, तुळशीराम, आकाराम, आसाराम, रामा, रामचंद्र, वरल्या आळीतला रामा, आशे बक्खळ राम आहेत. जेवढे राम आहेत तेवढे लक्ष्मण आहेत. हे आता लोकं ठेवतेत, नवीन नावं म्हंजे आदित्य, आराध्या, अथर्व, आर्यन ही काय नावं हैत का? लेकरांच्या नावामध्ये देवाचं नाव आसलं म्हंजे … The post तडका : राम राम मंडळी..! appeared first on पुढारी.

तडका : राम राम मंडळी..!

राम राम मंडळी, राम राम. तुमास्नी सांगतो आमच्या गावात जवळपास चाळीस राम हैत. सखाराम, तुकाराम, तुळशीराम, आकाराम, आसाराम, रामा, रामचंद्र, वरल्या आळीतला रामा, आशे बक्खळ राम आहेत. जेवढे राम आहेत तेवढे लक्ष्मण आहेत. हे आता लोकं ठेवतेत, नवीन नावं म्हंजे आदित्य, आराध्या, अथर्व, आर्यन ही काय नावं हैत का? लेकरांच्या नावामध्ये देवाचं नाव आसलं म्हंजे तेवढ्या टायमाला देवाचं नाव जास्त येळा घेतलं जातं आन् तेवढच जास्त पुण्य आपल्या पदरात पडतं म्हणून लेकरांची नावे राम, लक्ष्मण, सीता, कृष्ण, बजरंग अशी असायची. शिवाय सकाळी रामपारा मंडळी भेटली की, शहरातल्या लोकांसारखे नमस्कार, हाय, हॅलो म्हनत नाहीत. ते फक्त राम राम करतात. राम राम करून हात जोडले का समोरच्यालाबी राम राम होतो आन् देवाचंबी नाव घेतलं जातं. म्हंजे बघा, आपन इंडियन लोकं दिवसभर देवाचं नाव घेत असतो. आमच्या गावपांढरीत लेडीज बायांचे नावंपन आशेच अस्त्यात. सीताबाई, हरीबाई, ध्रुपदाबाई, मनकर्णिकाबाई, अहिल्याबाई, ताराबाई.
तसा आमच्या गावात एक रावण नावाचा माणूस आहे; पण त्याला भेटल्यावरपन सगळे जण राम राम म्हनतात आन् तोपन सगळ्यांना राम राम म्हणतो. कुणाला त्याचं विशेष काही वाटत नाही. रावणालाच वाटत नाही, तर दुसर्‍याला कुनाला वाईट कशाला वाटंल?
तर बुवा तुम्ही म्हनताल की, रामाचा आज काय ईशय काढला? सांगतो. तिकडे अयोध्येमध्ये राम मंदिर होनार म्हणून देशभर जल्लोष चालू आहे. प्रभू श्रीरामाचा जन्म जिथे झाला, त्या जागेवर अयोध्यामध्ये भव्य मंदिर होत आहे. नवीन वर्षात राम मुक्त होऊन दिमाखात त्याची प्राणप्रतिष्ठा होत आहे, याचा आनंद तमाम भारतीय लोकांना झालेला आहे. पन काही विघनसंतोषी लोक राम मंदिरासाठी किती खर्च झाला? आन् कसा झाला? याची आकडेमोड करत बसले आहेत. अरे, मंदिराच्या खर्चाची कसली आकडेमोड करता? त्यापेक्षा रामाचं नाव किती वेळा घेतलं त्याचे आकडे मोजा, तेच कामाला येनार आसतंय. आमच्या खेड्याच्या लोकायला दिवसभर राम असतो आन् काम असतं. पहाटेच्या येळेला आम्ही रामप्रहर म्हनतो. रामपारा म्हंजे रामप्रहर. रात्री झोपताना आराम करता. आरामातपन राम हायेच का न्हाई? अरे बाबांनो, देवाचं नाव घेने फार चांगले असते. एखाद्या डॉक्टरने चांगला इलाज केला तर आपण म्हंतो रामबाण इलाज केला.
रामबाण म्हंजे ज्याचा नेम चुकत नाही आणि बरोबर पाहिजे त्या पॉईंटवर जाऊन धडकते, तो बाण म्हंजे रामबाण. राम रामभाऊपासून ते पार सखाराम, तुळशीरामपर्यंत दिवसभर गावामध्ये रामनामाचा गजर आसतोय आन् तुम्ही म्हंता राम काय करायचाय? राम आहे तर जिंदगीत काही राम आहे, नाहीतर हे राम म्हनायची येळ यायची. म्हंजे बघा, या पृथ्वीवरून आपली एक्झिट घ्यायची वेळ झाली तरी हे राम म्हनावेच लागते. भुताखेताची भीती वाटली तर रामरक्षा म्हनावी लागते. आन् तुम्ही म्हनताय, राम कशाला पाहिजे? अरे राम आहे तर राम आहे आन् म्हनूनच राम राम आहे. आम्ही रामनवमी साजरी करतो, दसर्‍याच्या दिवशी गावाबाहेर जातो, आपट्याची पाने वाटतो. लेकरू जन्मले की ‘राम जन्मला ग सखी राम जन्मला’ हे पाळण्यातले गाने म्हनतो. आयुष्यामध्ये सगळी जागा व्यापून बसला आहे राम आन् तुम्ही म्हंता राम मंदिर कशाला पाहिजे? ईचार करा. आम्ही आपले रामभक्तीमध्ये दंग आहोत. प्रभू श्रीराम तुम्हाला बुद्धी देवो, एवढीच आम्ही विरोध करणार्‍यांसाठी प्रार्थना करू शकतो. बराय, येतो. राम राम.
Latest Marathi News तडका : राम राम मंडळी..! Brought to You By : Bharat Live News Media.