नेपाळी क्रिकेटपटू संदीप लामिछाने बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी

काठमांडू, वृत्तसंस्था : नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने याला तरुणीवर बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. काठमांडू जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी हा निकाल दिला. संदीपला पुढील सुनावणीवेळी शिक्षा सुनावण्यात येणार आहे; परंतु बलात्कार झाला तेव्हा संबंधित तरुणी अल्पवयीन नव्हती, असा निष्कर्षही न्यायालयाने काढला आहे. शिशीर राज ढकाल यांच्यासमोर रविवारपासून या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू होती.
6 सप्टेेंबर 2022 रोजी संदीप लामिछानेवर 17 वर्षीय तरुणीने बलात्कार केल्याची तक्रार मेट्रोपॉलिटन पुलिस सर्कलमध्ये केली होती. संदीप त्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत होता. 6 ऑक्टोबर रोजी तो मायदेशात परत आल्यानंतर काठमांडूच्या त्रिभुवन विमानतळावरच त्याला अटक करण्यात आली होती.
काठमांडू जिल्हा न्यायालयाने त्याला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्याचा आदेश दिला होता. यानंतर त्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 12 जानेवारी रोजी पटना हायकोर्टाने त्याची सुटका करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून संदीप जामिनावर बाहेर आहे. पीडित मुलीने शारीरिक आणि मानसिक शोषणाबद्दल त्याच्याकडून भरपाईची मागणी केली आहे.
Latest Marathi News नेपाळी क्रिकेटपटू संदीप लामिछाने बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी Brought to You By : Bharat Live News Media.
