आता लठ्ठपणासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे होणार नवीन वर्षात लागू
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : वैद्यकतज्ज्ञांनी एकत्रित अभ्यास करत ‘जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया’मध्ये नुकताच शोधनिबंध प्रकाशित केला आहे. यानुसार, लठ्ठपणासंबंधी नवीन मार्गदर्शक तत्त्वे नवीन वर्षात लागू होणार आहेत. 20 ते 69 वर्षे वयोगटातील भारतीय प्रौढांमध्ये 2040 पर्यंत लठ्ठपणाचे प्रमाण तिप्पट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या शोधनिबंधात बीएमआयवर आधारित नवीन लठ्ठपणा मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस करण्यात आली आर्हेें अशी माहिती मधुमेहतज्ज्ञ डॉ. नीता देशपांडे यांनी दिली.
मार्गदर्शक तत्त्वांसाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतातील 1,00,531 व्यक्तींच्या डेटाचे मूल्यमापन करण्यात आले. अभ्यासानुसार, देशातील लठ्ठपणाचे प्रमाण 40.3% इतके आहे. यामध्ये महिला, शहरी लोकसंख्या आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. लठ्ठपणाचे सर्वाधिक प्रमाण दक्षिण भारतात (46.51%) आहेत, तर सर्वात कमी पूर्व भारतात (32.96%) आहे.
या व्यक्ती बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरतील
लठ्ठपणाशी संबंधित कोणत्याही सहव्याधीसह किंवा 35 पेक्षा जास्त बीएमआय
लठ्ठपणाशी संबंधित एकापेक्षा जास्त सहव्याधींसह 32.5 पेक्षा जास्त बीएमआय
लठ्ठपणाशी संबंधित दोनपेक्षा जास्त सहव्याधीसह 30 पेक्षा जास्त बीएमआय
उपचार करूनही अनियंत्रित टाईप 2 मधुमेहासह आणि बीएमआय 27.5 पेक्षा जास्त
कंबरेचा घेर 80 से.मी.पेक्षा जास्त असलेल्या महिला आणि 90 से.मी.पेक्षा जास्त असलेले पुरुष, ज्यांना लठ्ठपणाशी संबंधित आजार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन मार्गदर्शक तत्त्वे आधीच लागू करण्यात आली आहेत आणि लठ्ठपणावरील उपचाराशी संबंधित समस्यांवर आधारित आहेत. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखले जाते आणि जगातील सर्वाधिक तरुणांची संख्याही इथे आहे. बॉडी मास इंडेक्स ही लठ्ठपणाची व्याख्या करण्यासाठी वापरली जाणारी सर्वसामान्य संज्ञा आहे. शारीरिक निष्क्रियता आणि वृध्दत्व यांचा भारतातील लठ्ठपणाशी संबंध आहे. लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोम असलेल्या भारतीय लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका जास्त असतो.
– डॉ. शशांक शहा, शल्यचिकित्सक
हेही वाचा
उत्तर भारतात दाट धुक्याचा पुन्हा रेड अलर्ट
नेपाळी क्रिकेटपटू संदीप लामिछाने बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी
चांगली बातमी : ‘एक्स्प्रेस-वे’वरील अपघातांमध्ये यंदा घट
Latest Marathi News आता लठ्ठपणासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे होणार नवीन वर्षात लागू Brought to You By : Bharat Live News Media.