भारताचा नेदरलँडवर 160 धावांनी विजय
पुढारी ऑनलाईन डेस्क : गट फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा सामना पहिल्या सेमीफायनलमध्ये 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी सर्व नऊ विरोधकांचा पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा पराभव केला आहे. (IND vs NED)
पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियाचे 18 गुण आहेत. गट फेरीत संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.तर, नेदरलँड्सने विश्वचषक स्पर्धेतील आपला प्रवास गुणतालिकेत 10व्या स्थानावर संपवला. त्यांनी नऊ सामन्यांत दोन विजय मिळवले. तर, नेदरलँड्सला सात सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. (IND vs NED)
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 50 षटकांत चार विकेट गमावत 410 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 47.4 षटकांत सर्वबाद 250 धावांवर आटोपला. प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर (नाबाद 128) आणि के. एल. राहुल (102) यांची शतके आणि रोहित शर्मा (51), शुभमन गिल (61), विराट कोहली (51) यांनी अर्धशतके झळकावून भारताला 4 बाद 410 अशी जबरदस्त धावसंख्या उभी करून दिली.
नेदरलँडसाठी तेजाने झळकावले अर्धशतक
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरूने सर्वाधिक 54 धावा केल्या. सायब्रँडने 45, कॉलिन अकरमन 35 आणि मॅक्स ओडाडने 30 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 17 धावा केल्या. लोगान व्हॅन बीक आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे प्रत्येकी 16 धावा करून बाद झाले. बास डी लीडेने 12 धावा, आर्यन दत्तने पाच धावा आणि वेस्ली बॅरेसीने चार धावा केल्या. पॉल व्हॅन मीकरेन तीन धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
चाहत्यांना दिवाळी भेट
टीम इंडियाने दिवाळीच्या दिवशी चाहत्यांना विजयाची भेट दिली. 2003 च्या विश्वचषकात भारताने सलग आठ सामने जिंकले होते. नवव्या विजयासह त्याने यावेळी हा विक्रम मोडीत काढला. वर्ल्ड कपमध्ये सलग सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. 2003 मध्ये त्याने 11 सामने जिंकले होते.
भारताच्या नऊ खेळाडूंनी गोलंदाजी केली
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. रोहित शर्माने 11 पैकी नऊ खेळाडूंना गोलंदाजी दिली. केवळ केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी गोलंदाजी केली नाही. संघाचे वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट केली. तर, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनाही गोलंदाजीची संधी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद शमीला या सामन्यात एकही यश मिळाले नाही.
हेही वाचा :
Shrikant Shinde : इर्शाळवाडीवासियांची पुढल्या वर्षी हक्काच्या घरात दिवाळी: खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन
Bollywood Diva Celebs Diwali : करीना-आलिया रेड सूटमध्ये, दिवाळी पार्टीत ‘या’ सेलिब्रिटींनी लावले चारचाँद
Pune News : बारामती, शिरूरमध्ये 4 कोटींची नुकसानभरपाई
The post भारताचा नेदरलँडवर 160 धावांनी विजय appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : गट फेरीतील शेवटच्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा 160 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा सामना पहिल्या सेमीफायनलमध्ये 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे. भारत या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. त्यांनी सर्व नऊ विरोधकांचा पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडचा पराभव केला आहे. …
The post भारताचा नेदरलँडवर 160 धावांनी विजय appeared first on पुढारी.