इस्रायल व्यापारी जहाजाच्‍या मदतीला ‘ICGS विक्रम’ सरसावले

पुढारी ऑनलाईन डेस्क: हिंदी महासागरात भारतीय किनापट्टीलगत इस्रायली व्यापारी जहाजावर शनिवारी (दि.२३)दुपारी ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात इस्रायलशी संलग्न असलेल्या जहाजाला आग लागली. यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या ‘ICGS विक्रम’ या भारतीय तटरक्षक जहाजाने हिंदी महासागरातील हल्ला झालेल्या या जहाजाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. याची सखोल चौकशी केली जात असल्याचे भारतीय … The post इस्रायल व्यापारी जहाजाच्‍या मदतीला ‘ICGS विक्रम’ सरसावले appeared first on पुढारी.
इस्रायल व्यापारी जहाजाच्‍या मदतीला ‘ICGS विक्रम’ सरसावले


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: हिंदी महासागरात भारतीय किनापट्टीलगत इस्रायली व्यापारी जहाजावर शनिवारी (दि.२३)दुपारी ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात इस्रायलशी संलग्न असलेल्या जहाजाला आग लागली. यामुळे जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या ‘ICGS विक्रम’ या भारतीय तटरक्षक जहाजाने हिंदी महासागरातील हल्ला झालेल्या या जहाजाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. याची सखोल चौकशी केली जात असल्याचे भारतीय नौदल अधिकाऱ्यांनी माहिती देताना स्पष्ट केल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. (ICGS Vikram)
हल्ला झालेले इस्रायली संलग्न जहाज ‘एमव्ही केम प्लूटो’ या व्यापारी जहाजावर हिंदी महासागरात हल्ला झाला. हे जहाज अरेबियन समुद्रातून पोरंबंदपासून 217 नॉटिकल मैल अंतरावरून जात असताना ही घटना घडली आहे. या जहाजात कच्चे तेल असून ते सौदी अरेबियामधून मंग्लोरच्या दिशेने जात होते. दरम्यान, भारतीय किनारपट्टीवर तैनात असलेले ICGS विक्रम हे भारतीय तटरक्षक जहाज ईईझेड (EEZ) झोनमध्ये गस्तीवर तैनात होते. दरम्यान, इस्रायली जहाज संकटात सापडल्याचे समजताच ICGS विक्रमने या जहाजाच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. (ICGS Vikram)

Indian Navy warships in the vicinity are also moving towards the merchant ship MV Chem Pluto in the Arabian Sea outside Indian EEZ: Indian Navy Officials pic.twitter.com/KgRYAvRdQ3
— ANI (@ANI) December 23, 2023

Indian Navy, Coast Guard vessels moving towards merchant ship hit by suspected drone attack
Read @ANI Story | https://t.co/43LyWT0r6I#IndianNavy #ICGSVikram #DroneAttack pic.twitter.com/HpGrpu8irR
— ANI Digital (@ani_digital) December 23, 2023

हल्ल्याची जबाबदारी हुथी बंडखोरांनी स्वीकारली
भारतीय नौदलाने अलीकडेच अपहरण केलेल्या माल्टा ध्वजांकित मालवाहू जहाजातून जखमी खलाशाची सुटका करण्यात मदत केल्यानंतर आज ही घटना समोर आली आहे. शनिवारी १६ डिसेंबर रोजी लायबेरियनचा झेंडा असलेल्या दोन मालवाहतूक जहाजांवर हुथी बंडखोरांनी हल्ला केला. अशाप्रकारे यापूर्वी अनेकवेळा लाल समुद्रातील अनेक जहाजांवर येमेनच्या हुथी बंडखोरांनी हल्ला चढवला आहे.  हिंदी महासागरातील इस्‍त्रायलच्‍या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही. (ICGS Vikram)
परिसरातील युद्धनौका देखील मदतीला धावल्या
दरम्यान ड्रोन हल्ल्यामुळे लागलेली आग विझवण्यात आली आहे; परंतु जहाजाच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. यामध्ये सुमारे 20 भारतीयांसह सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. ICGS विक्रमने मदत पुरवण्यासाठी परिसरातील सर्व जहाजांना सतर्क केले आहे,” असेही संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहेत. परिसरातील भारतीय नौदल युद्धनौका देखील भारतीय ईईझेडच्या बाहेर अरबी समुद्रातील एमव्ही केम प्लुटो या व्यापारी जहाजाकडे जात आहेत,” असे देखील भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. (ICGS Vikram)
ICGS Vikram: ब्रिटीश सागरी सुरक्षा फर्म ‘अ‍ॅम्ब्रे’ ने घटना उघडकीस आणली
ब्रिटीश सैन्याच्या युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स आणि सागरी सुरक्षा फर्म अ‍ॅम्ब्रे यांच्या म्हणण्यानुसार, हिंद महासागराच्या भारताच्या किनारपट्टीनजीक इस्‍त्रायलच्‍या व्‍यापारी जहाजावर हल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली. दरम्यान, लायबेरियन ध्वज असलेल्या जहाजावरील आग लागलेल्या टँकरमध्ये रासायनिक उत्पादने होती. हे व्यापारी जहाज इस्रायल सागरी दलाशी संलग्न असण्याची शक्यता वर्तवली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणी स्वीकारलेली नाही.
हेही वाचा:

Houthi group strikes | हुथी बंडखोरांची लाल समुद्रात दादागिरी; लायबेरियन जहाजांवर हल्ला करत दमदाटी
Houthi Fired On USA Ship : ‘हुथी’ दहशतवाद्यांचा युद्धनौकेवर हल्ला; अमेरिकन लष्कराचा दावा
Yemen’s Houthi rebels hijack cargo ship | लाल समुद्रात जहाज अपहरणाचा थरार! हुथी बंडखोरांकडून व्हिडिओ जारी

The post इस्रायल व्यापारी जहाजाच्‍या मदतीला ‘ICGS विक्रम’ सरसावले appeared first on Bharat Live News Media.

Go to Source