‘दे दणादण’..चौकार-षटकारांची आतषबाजी..! भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान

‘दे दणादण’..चौकार-षटकारांची आतषबाजी..! भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान


पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी टीम इंडियाच्‍या फलंदाजांनी नेदरलँड विरुद्‍ध प्रथम फलंदाजी करताना चौकार-षटकारांची आतषबाजी करत चाहत्‍यांची मने जिंकली. सलामीवीर रोहित शर्मा -शुभमन गिल यांनी केलेल्‍या भक्‍कम पायभरणी. यानंतर श्रेयस अय्‍यरचे धडाकेबाज शतक, त्‍याला विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दिलेल्‍या दमदार साथीच्‍या जोरावर भारताने नेदरलँड समोर…. धावांचा डोंगर रचला. आजच्‍या सामन्‍यातील वैशिष्‍ट्‍य म्‍हणजे टीम इंडियातील पहिल्‍या पाच फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. एकदिवसीय विश्‍वचषक स्‍पर्धेत अशी विक्रमी कामगिरी ( पाचही फलंदाजांचे अर्धशतक ) भारत पहिला संघ ठरला आहे. (IND vs NED)
‘अर्धशतकांची माळ’
सामन्याच्या 43 व्या षटकात राहूलनेही आपले अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह भारतीय संघाने वन-डे वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या प्रथम पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकवण्याची कामगिरी केली आहे. याआधी वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी कोणत्याही संघाने केली नव्हती. यामध्ये राहूलसह (102) रोहित शर्मा(61), शुभमन गिल(51), विराट कोहली (51) आणि श्रेयस अय्यर (128*) यांनी अर्धशतके झळकावली. श्रेयस अय्‍यर आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळीचे शतकामध्‍ये रुपांतर केले.
भारताची फलंदाजी
भारताला पहिला झटका, शुभमन गिल बाद
भारताची पहिली विकेट 100 धावांवर पडली. शुभमन गिल 32 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. मीकेरेनने त्याला निदामनुरुकरवी झेलबाद केले. गिलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले.
रोहित शर्माचे शानदार अर्धशतक
रोहित शर्माने शानदार खेळी करत 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये त्याने आपल्या खेळीत 54 चेंडू 61 धावांची खेळू केली. 8 चौकार आणि 2 षटकार लगावले.
अर्धशतक झळकावून रोहित शर्मा बाद
सामन्याच्या 18 व्या षटकात कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारताला दुसरा झटका बसला. त्याला नेदरलॅन्डचा गोलंदाज बास दे लीडने बरासी करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 54 चेंडू 61 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले.
भारताला ‘विराट’ धक्का, कोहली अर्धशतक झळकावून बाद
विराटने सामन्यात 53 चेंडूत अर्धशतक झळकावले. परंतु, सामन्याच्या 29 व्या षटकात विराट कोहलीच्या रूपात भारताला मोठा झटका बसला. त्याला नेदरलॅन्डचा गोलंदाजव्हॅन डर मर्वेने क्लीन बोल्ड केले. विराटने आपल्या खेळीत 56 चेंडूत 51 धावांची खेळी केली.
श्रेयस अय्यरचे शानदार अर्धशतक
सामन्याच्या 34 व्या षटकात चौकार लगावत 48 चेंडूत श्रेयस अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार लगावले.
‘अर्धशतकांची माळ’ केएल राहूलचनेही झळकावली हाफ सेन्चुरी
सामन्याच्या 43 व्या षटकात राहूलनेही आपले अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह भारतीय संघाने वन-डे वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताच्या प्रथम पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकवण्याची कामगिरी केली. याआधी वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी कोणत्याही संघाने केली नव्हती. यामध्ये राहूलसह (88*) रोहित शर्मा(61), शुभमन गिल(51), विराट कोहली (51)  यांनी अर्धशतके झळकावली तर श्रेयर अय्यरने अर्धशतकाचे रूपांतर (110*) शतकामध्ये केले.
श्रेयस अय्यरचे शानदार शतक
सामन्याच्या 46 व्या षटकात श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण केले. आपल्या खेळीमध्ये 84 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. यासह अय्यर-राहूल जोडीन चौथ्या विकेटसाठी 106 चेंडूत 146 धावांची भागिदारी केली.
केएल राहूलचे दमदार शतक
सामन्याच्या 50 षटकाच्या केएल राहूलनेही अर्धशतकाचे रूपांतर शतकात केले. त्याने 62 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने आपले शतक पूर्ण केले.
शतक झळकावून राहूल माघारी

शतक झळकवल्यानंतर आक्रमक फटका मारताना केएल राहूल बाद झाला. त्याला नेदरलॅन्डचा गोलंदाज बास दे लीडीने सायब्रॅन्ड करवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत 64 चेंडूत 102 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 11 चौकार आणि 4 षटकार लगावले. यासह अय्यर-राहूल जोडीने चौथ्या विकेटसाठी 120 चेंडूक 208 धावांची खेळी केली.

KL Rahul also reaches his FIFTY in Bengaluru 😎
This has been a clinical knock as #TeamIndia sail past 3⃣0⃣0⃣
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/SF1mHHZ3ft
— BCCI (@BCCI) November 12, 2023

हेही वाचा :

Bollywood Diva Celebs Diwali : करीना-आलिया रेड सूटमध्ये, दिवाळी पार्टीत ‘या’ सेलिब्रिटींनी लावले चारचाँद
Mathura Fire: मथुरा येथे फटाका स्‍टाॅलला भीषण आग; ४ गंभीर, अनेकजण जखमी
Healthy Diwali : फराळ खाल्ल्यानंतर तुमचेही वजन वाढते का? टेन्शन घेऊ नका, हे वाचा

The post ‘दे दणादण’..चौकार-षटकारांची आतषबाजी..! भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी टीम इंडियाच्‍या फलंदाजांनी नेदरलँड विरुद्‍ध प्रथम फलंदाजी करताना चौकार-षटकारांची आतषबाजी करत चाहत्‍यांची मने जिंकली. सलामीवीर रोहित शर्मा -शुभमन गिल यांनी केलेल्‍या भक्‍कम पायभरणी. यानंतर श्रेयस अय्‍यरचे धडाकेबाज शतक, त्‍याला विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दिलेल्‍या दमदार साथीच्‍या जोरावर भारताने नेदरलँड समोर…. धावांचा डोंगर रचला. आजच्‍या सामन्‍यातील वैशिष्‍ट्‍य …

The post ‘दे दणादण’..चौकार-षटकारांची आतषबाजी..! भारताने नेदरलँडला दिले 411 धावांचे आव्‍हान appeared first on पुढारी.

Go to Source