शेडमध्ये घुसलेला बिबट्या पाच तासानंतर जेरबंद

संगमनेर : Bharat Live News Media वृत्तसेवा : संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात आदर्श नगरमधील विलास मानकर यांच्या घराजवळील पडक्या पत्र्याच्या शेडमध्ये बिबट्या घुसला होता. तब्बल एक ते दीड तास शर्तीचे प्रयत्न करत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. बिबट्याने संगमनेर शहरातील गणेशनगरमधून नाशिक रस्ता ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये आश्रय घेतला. त्यानंतर तो पाठीमागील बाजूने थेट मालदाड रोडवरील पद्मा नगर येथील महावितरण कंपनीच्या उपअभियंता यांच्या कार्यालयाच्या समोरील काटवानात घुसला.
त्यानंतर तेथील गोंधळामुळे बिबट्या मालदाड रोड मार्गे धावत जाऊन भारत नगरच्या आदर्श कॉलनीतील विलास मानकर यांच्या पत्र्याच्या मोकळ्या शेडमध्ये घुसला. वनविभागाच्या कर्मचा-यांनी सर्व प्रथम मानकर यांच्या घराच्या दोन्ही बाजूने त्याला पकडण्यासाठी जाळे टाकले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आणलेल्या पिंजऱ्यात त्याला दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जेरबंद करण्यात आले.
त्या बिबट्याला पाहण्यासाठी मालदाड रोड पद्मानगर भारत नगर आदर्श कॉलनी सह परिसरातील बघ्यांची मोठ्याप्रमाणात गर्दी उसळली होती. या बिबट्याला पकड ण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील केदार, सचिन लोंढे, वनपाल, सुहास उपासनी, संतोष पारधी, रामकृष्ण सांगळे, सुभाष धनापुणे, रवी पडवळ, देविदास जाधव, वनरक्षक खेमनर, संगमनेर शहराचे पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, सहा य्यक फौजदार रोहिदास लोखंडे यांच्या सह पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले.
हेही वाचा :
Nagpur Bank Scam Case : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनिल केदार यांच्यासह सहाजण दोषी
Sanjay Raut : पुंछ हल्ला मिनी पुलवामा हल्ला,सरकार कोणता उत्सव साजरा करतंय : संजय राऊत
The post शेडमध्ये घुसलेला बिबट्या पाच तासानंतर जेरबंद appeared first on Bharat Live News Media.
