प्रेमाची गोष्ट : मुक्ता-सागरच्या विवाह सोहळ्यातील खास फोटो पाहा
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हो नाही म्हणता म्हणता अखेर मुक्ता आणि सागर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. खरंतर दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी या दोघांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे सई. सईवरच्या प्रेमापोटी या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लवकरच तो पूर्णत्वासही जाणार आहे. (प्रेमाची गोष्ट)
संबंधित बातम्या –
जाऊ बाई गावात : ‘आर्मी टास्क करताना हार्दिकचा हात निखळला’
Prabhas Salaar Review : अंगावर शहारे आणणारा…; प्रभासचा धमाकेदार अॅक्शन सीनसह ‘सालार’ प्रदर्शित
Dunki Movie Review : शाहरूखच्या ‘डंकी’वर कॉमेन्ट्सचा पाऊस; थिएटर बाहेर चाहत्यांचा धुरळा
गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही असणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. त्यामुळे लग्नात खऱ्या अर्थाने मुक्ता-सागर सोबतच दोन कुटुंबही नव्या नात्यात बांधली जाणार आहेत.
मुक्ता-सागरच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन-सायली लावली खास हजेरी लावणार आहेत. यासोबतच लग्नात सावनीची देखील एन्ट्री होणार आहे. सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे. त्यामुळे लग्न निर्विघ्नपणे पार पडणार का? याची उत्सुकता नक्कीच असेल.
पहायला विसरु नका विवाह विशेष प्रेमाची गोष्ट रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
The post प्रेमाची गोष्ट : मुक्ता-सागरच्या विवाह सोहळ्यातील खास फोटो पाहा appeared first on Bharat Live News Media.