जळगाव : मोटरसायकलसह 1 लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला
जळगाव: जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. रावेर अमळनेर चोपडा या ठिकाणी मोटरसायकल चोरीला गेली, तर जळगाव तालुक्यात पोकलँड सामान व एरंडोल तालुक्यातून वीज वितरण कंपनीच्या अल्युमिनियमच्या तारा व डीपीचे ऑइल असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
जिल्ह्यात दररोज किमान दोन-तीन मोटर सायकल चोरीला जात आहे. रावेर येथे राहणारे माधव सिताराम सातव यांची रावेर बस स्थानकात लावलेली 40 हजार रुपयांची टीव्हीएस कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यानी लांबवली. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. हेडकॉन्स्टेबल ईश्वर चव्हाण अधिक तपास करीत आहे. अमळनेर शहरातील कचेरी रोड मंगलमूर्ती शेजारी अनमोल सुपर शॉप जवळ धर्मेंद्र टील्लोकचंद सासंननी यांची होंडा एक्टिवा 12 हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्याने लांबवली. याप्रकरणी अमळनेर पोलिसत गुन्हा नोंद करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल घनश्याम पवार हे पुढील तपास करीत आहे.
वैजापूर येथे राहणारे राहुल बारेला याच्या मालकीची वीस हजार रुपयांची बजाज कंपनीची मोटरसायकल अज्ञात चोरांनी घरासमोर लांबवली. याप्रकरणी चोपडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक फौजदार बापू साळुंखे हे तपास करीत आहे. जळगाव तालुक्यातील आहुजा नगर येथे मोकळ्या जागेत लावलेले तुषार दिलीप मोरे यांच्या मालकीचे पोकलँड मशीनचे 60 हजार रुपयांचे वेगवेगळे सामान चोरीला गेले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे तपास करीत आहे. एरंडोल तालुक्यातील उंमरर्डे व विखरण यांच्या शेत शिवारातून 38 हजारांचे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अल्युमिनियमच्या तारा व डीपी मधील ऑइल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकारे लक्ष्मी माने अभियंता यांनी गेलेल्या तक्रारी एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास रवींद्र तायडे करीत आहे.
हेही वाचा :
Thane News : ठाणे : पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पदभार स्वीकारला
Ankita Lokhande : अंकिताने सुशांतसोबतचे ब्रेकअप ठेवलेलं लपवून; बिग बॉसमध्ये मोठा खुलासा
…अन्यथा 25 डिसेंबरपासून ऊसतोड बंद
The post जळगाव : मोटरसायकलसह 1 लाख 70 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला appeared first on Bharat Live News Media.