नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’साठी शनिवारी बैठक; आ. सुनील टिंगरेंच्या मागणीला यश

पुणे: येरवडा ते वाघोली मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’ करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी येत्या शनिवारी (दि. 23) बैठक बोलावली आहे. पुण्यातील वाहतूककोंडीच्या लक्षवेधीवर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या मागणीवर ही बैठक घेण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार टिंगरे म्हणाले, महापालिकेत समाविष्ट गावांत 300 कि.मी.चे रस्ते असून, … The post नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’साठी शनिवारी बैठक; आ. सुनील टिंगरेंच्या मागणीला यश appeared first on पुढारी.

नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’साठी शनिवारी बैठक; आ. सुनील टिंगरेंच्या मागणीला यश

पुणे: येरवडा ते वाघोली मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’ करण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी येत्या शनिवारी (दि. 23) बैठक बोलावली आहे. पुण्यातील वाहतूककोंडीच्या लक्षवेधीवर वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केलेल्या मागणीवर ही बैठक घेण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आमदार टिंगरे म्हणाले, महापालिकेत समाविष्ट गावांत 300 कि.मी.चे रस्ते असून, त्यामधील फक्त 140 कि.मी.चे रस्ते आतापर्यंत विकसित झाले आहेत. उर्वरित रस्त्यांची अवस्था चालता येणार नाही, अशी आहे. पर्यायी रस्ते विकसित करण्यासाठी महापालिकेकडून काहीच कार्यवाही होत नाही. सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या नगर रस्त्याला पर्यायी असलेला शिवणे ते खराडी हा रस्ता 1997 पासून कागदावरच आहे.
महापालिका फक्त बिल्डरांचे रस्ते करते
महापालिका पीपीपीच्या माध्यमातून 500 कोटींच्या रकमेतून 160 कि.मी.चे सिमेंट काँक्रीटचे रस्ते विकसित करत आहे. मात्र हे सर्व रस्ते बिल्डरांसाठीचे आहेत. गोरगरिबांच्या वस्त्या असलेल्या ठिकाणचे रस्ते महापालिका करत नाही. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी अंदाजपत्रकात असलेली तरतूदसुद्धा खर्च केलेली नाही. त्यामुळे निधी असतानाही खड्डे न बुजविणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणही आमदार टिंगरे यांनी केली.
हेही वाचा

Mumbai : केस, अंतर्वस्त्रात लपवले ९ कोटींचे कोकेन, युगांडाच्या महिलेला अटक
अठरा वर्षांपासून डोक्यात होती गोळी!
पांढरी जीभ देते आजारांचे संकेत

 
The post नगर रस्ता ‘सिग्नल फ्री’साठी शनिवारी बैठक; आ. सुनील टिंगरेंच्या मागणीला यश appeared first on Bharat Live News Media.

Go to Source