नव्या 42 सरपंचांना 5.5 कोटींची लॉटरी !
नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा अबंधित निधीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील 1226 ग्रामपंचायतींसाठी 37 कोटी 86 लाख 11 हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नुकत्यात निवडणूक झालेल्या 42 ग्रामपंचायतींना बंधित आणि अबंधितची दोन्ही हप्ते अशी तब्बल 5.44 कोटींचा विकास निधी मिळाल्याने नवनिर्वाचित सरपंचांच्या मनातही आनंदाचे लाडू फुटणार आहेत.
केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी 2023-24 च्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्याला 712 कोटींचा निधी राज्याकडे प्राप्त झालेला आहे. नगरसाठीही 37 कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ यांनी लोकसंख्येनुसार हा निधी ग्रामपंचायतींना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आता अबंधितच्या कामांना वेग येणार आहे.
निवडणुका संपताच निधीचा मार्ग मोकळा!
जिल्ह्यातील 42 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने त्या वेळी तिथे प्रशासक होते. त्यामुळे बंधितचा हप्ता ‘त्या’ ग्रामपंचायतींचा थांबविण्यात आला होता. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर संबंधित ठिकाणी नवीन पदाधिकारी आले आहेत. त्यामुळे शासनाने मागील बंधितचा 3 कोटी 26 लाख आणि कालचा अबंधितचा 2 कोटी 18 लाखांचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.
कोण-कोणती कामे घेणार!
ग्रामपंचायतींच्या आराखड्यानुसार अबंधित कामांसाठी हा निधी खर्च करावा लागणार आहे. यामध्ये गावातील आरोग्याच्या प्रश्नांवरील कामे, शैक्षणिक सुविधा, मागासवर्ग विकास, तसेच महिला बालकल्याण विभागातील तरतुदींसह अन्य कामांवर हा खर्च करावा लागणार आहे.
झेडपी, पंचायत समितींना निवडणुकानंतरच निधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अजूनही लांबणीवरच आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक असल्याने या संस्थांचा 10 टक्के प्रमाणचा बंधित आणि अबंधितचा हप्ता रोखून ठेवलेला आहे. परिणामी कालचा अबंधितचा निधीही झेडपीला मिळालेला नाही. त्यासाठी निवडणुकांची वाट पहावी लागणार आहे.
The post नव्या 42 सरपंचांना 5.5 कोटींची लॉटरी ! appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या नव्या 42 सरपंचांना 5.5 कोटींची लॉटरी !
नव्या 42 सरपंचांना 5.5 कोटींची लॉटरी !
नगर : पुढारी वृत्तसेवा : पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा अबंधित निधीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील 1226 ग्रामपंचायतींसाठी 37 कोटी 86 लाख 11 हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नुकत्यात निवडणूक झालेल्या 42 ग्रामपंचायतींना बंधित आणि अबंधितची दोन्ही हप्ते अशी तब्बल 5.44 कोटींचा विकास निधी मिळाल्याने नवनिर्वाचित सरपंचांच्या …
The post नव्या 42 सरपंचांना 5.5 कोटींची लॉटरी ! appeared first on पुढारी.