पंजाबचा कुख्यात गुंड अमृपाल सिंग पोलिसांच्या गोळीबारात ठार

पंजाबचा कुख्यात गुंड अमृपाल सिंग पोलिसांच्या गोळीबारात ठार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बुधवारी (दि. २०) सकाळी अमृतसरजवळील जंदियाला गुरु येथे पंजाब पोलिसांशी झालेल्या गोळीबारात गँगस्टर अमृतपाल सिंग (२२) ठार झाला. पोलीस कोठडीत असलेल्या सिंगला जंदियाला गुरु येथे अमली पदार्थ आणि हत्यारांच्या साठ्याच्या जप्ती प्रकरणी नेत असताना ही घटना घडली.
पंजाबचा कुख्यात गुंड अमृतपाल सिंगला मंगळवारी (दि. १९) अटक करण्यात आली होती. पोलिसांनी जंदियाला गुरु येथे अमृतपाल, सिंगजवळील अमली पदार्थ आणि हत्यारांच्या साठ्याच्या जप्ती प्रकरणी नेण्यात येत होते. यावेळी अमृतपालने त्याच्या जवळील पिस्तुलाने पोलिसांवर गोळीबार करण्यास करण्यास सुरुवात केली. या गोळीबारानंतर पोलीस आणि अमृतपाल याच्यात झालेल्या चकमकीत अमृतपाल जागीच ठार झाला. ग्रामीण अमृतसरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतींदर सिंग यांनी या गोळीबाराबाबतची माहिती दिली. गोळीबारात जखमी झालेल्या अमृतपालला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

VIDEO | Gangster Amritpal Singh (22) killed in an exchange of fire with #Punjab Police while trying to flee in Amritsar’s Jandiala Guru area. Two police officials also injured.
“During interrogation, he disclosed that he had hidden 2 Kgs of heroin. We brought him here to recover… pic.twitter.com/ORcaBNO3Ru
— Press Trust of India (@PTI_News) December 20, 2023

हेही वाचा 

Shubham Dubey: आयपीएलमध्ये रातोरात कोट्यधीश झालेला विदर्भातील शुभम दुबे कोण आहे ?

The post पंजाबचा कुख्यात गुंड अमृपाल सिंग पोलिसांच्या गोळीबारात ठार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source