मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mohammed Shami Arjuna Award : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशाचा हा दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असून या यादीत शमीसह त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. पॅरा अॅथलीट शीतल देवी हिच्या नावाचाही या यादीत समावेश … The post मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mohammed Shami Arjuna Award : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशाचा हा दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असून या यादीत शमीसह त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. पॅरा अॅथलीट शीतल देवी हिच्या नावाचाही या यादीत समावेश आहे. 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते सर्व पुरस्कार प्रदान केले जातील.
2023 च्या विश्वचषकातील शमीने दमदार गोलंदाजी केली. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 24 बळी घेतले होते. त्याच्या या कामगिरीची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रीडा मंत्रालयाला अर्जुन पुरस्कारासाठी शमीच्या नावाची शिफारस केली होती. ज्यानंतर क्रीडा मंत्रालयानेही सकारात्मकता दाखवत बीसीसीआयची विनंती मान्य केली.
देशातील नंबर वन पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. खेलरत्न हा भारतातील सर्वात मोठा पुरस्कार आहे.
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
अर्जुन पुरस्कार
मोहम्मद शमी (क्रिकेट), अजय रेड्डी (दृष्टिबाधित क्रिकेट), ओजस प्रवीण देवताले, अदिति गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), पारुल चौधरी आणि मुरली श्रीशंकर (ॲथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर वैशाली (बुद्धीबळ), दिव्यकृती सिंह आणि अनूष अग्रवाल (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादुर पाठक आणि सुशीला चानू (हॉकी), पिंकी (लॉन बॉल), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि ईशा सिंह (नेमबाजी), अंतिम पंघाल आणि सुनील कुमार (कुस्ती), अयहिका मुखर्जी (टेबल टेनिस), नाओरेम रोशिबिना देवी (वुशू), पवन कुमार आणि रितु नेगी (कबड्डी), नसरीन (खोखो), हरिंदर पाल सिंह संधू (स्क्वाश), प्राची यादव (पॅरा केनोइंग).
ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : कविता सेल्वराज (कबड्डी), मंजुषा कंवर (बॅडमिंटन) विनीत कुमार शर्मा (हॉकी).
द्रोणाचार्य पुरस्कार
गणेश प्रभाकरन (मल्लखांब), महावीर सैनी (पॅरा अॅथलेटिक्स), ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), शिवेंद्र सिंग (हॉकी).
द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
जसकीराज सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंत कुमार पुशीलाल (टेबल टेनिस).
 
The post मोहम्मद शमीसह 26 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर appeared first on Bharat Live News Media.

Go to Source