Pune : रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम रखडले

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड, राजगड, तोरणा गडकोटांसह वेल्हे व हवेली तालुके जवळच्या अंतराने जोडणार्‍या रांजणे – पाबे घाट रस्त्याचे काम गेली अनेक महिन्यांपासून रखडले आहे. घाट रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हायब्रीड अ‍ॅन्युटी योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे काम करण्यात येत … The post Pune : रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम रखडले appeared first on पुढारी.

Pune : रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम रखडले

वेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा :  सिंहगड, राजगड, तोरणा गडकोटांसह वेल्हे व हवेली तालुके जवळच्या अंतराने जोडणार्‍या रांजणे – पाबे घाट रस्त्याचे काम गेली अनेक महिन्यांपासून रखडले आहे. घाट रस्त्याची खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हायब्रीड अ‍ॅन्युटी योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याचे काम करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. हा रस्ता खचला आहे. मुख्य घाटात दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे आहेत. अरुंद वळणे व  तीव्र चढ-उतार असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला उंच डोंगर व दुसर्‍या बाजूला खोल दर्‍या आहेत. त्यामुळे दरीत वाहने कोसळून मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे.
याबाबत वेल्हे तालुका भाजपचे अध्यक्ष आनंद देशमाने म्हणाले, वारंवार तक्रार करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
 
The post Pune : रांजणे-पाबे घाट रस्त्याचे काम रखडले appeared first on Bharat Live News Media.

Go to Source