आयशा खानच्या येण्याने मुनव्वर फारुकीचा बदलला गेम
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १७ मध्ये आयशा खान आणि मुनव्वर फारुकी यांच्यात जवळीक पाहायला मिळतेय. बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आयशा आणि मुनव्वर यांच्या वाढत्या जवळीकतेने बिग बॉसमधील संपूर्ण गेम बिघडवलं. (Bigg Boss 17 ) आयशा खानची एन्ट्री झाल्यानंतर मुनव्वरचा गेमचं पालटला. मुनव्वरचा गेम एक्सपोझ करणारी आयशा आता रोमान्स करताना दिसत आहे. दोघांमधील वाढत्या जवळीकतेने सर्वांना चिंतेत टाकलं आहे. (Bigg Boss 17 )
संबंधित बातम्या –
Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा मध्यरात्रीपासून शो; तेलंगणा सरकारची परवानगी
Dunki Advance Booking : शाहरूखच्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई
Actress Wedding 2023 : बी-टाऊनच्या ‘या’ अभिनेत्रींनी सात फेरे घेऊन बांधली लग्नगाठ
आयशाने मुनव्वर तिला धोका देण्याचा आरोप केल होता आणि हेदेखील म्हटले होते की, ती मुनववरला कधी माफ करणार नाही.
मुनव्वर समोर धाय मोकलून रडू लागली आयशा
बिग बॉसच्या शोमध्ये मुनव्वरची गर्लफ्रेंड आयशा खान एन्ट्रीने सर्वात मोठे सरप्राईज दिले. आयशाने बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी एका मुलाखतीमध्ये मुनव्वरवर खूप आरोप केले होते. दरम्यान, ती बिग बॉसच्या घर में एन्ट्री करताच तिने मुनव्वरची अनेक रहस्य उलगडले. दरम्यान, एक नवा प्रोमो समोर आला आहे, आयशा ही मुनव्वरशी बोलताना खूप भावूक होताना दिसलीय.
बिग बॉस १७ चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अखेर मुनव्वर आणि आयशा खान एकमेकांशी बोलत आहेत. मुनव्वर आयशाला म्हणतो की, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आयशा देखील नकार न देता म्हणते बस आणि बोल. आयशा म्हणते की, ‘मला विश्वास होत नाही की, शोमध्ये मी ज्या माणसाला पाहते, त्याने हे सर्व केलं आहे.’
The post आयशा खानच्या येण्याने मुनव्वर फारुकीचा बदलला गेम appeared first on Bharat Live News Media.