धुळेकरांच्या मालमत्तांच्या वाढीव घरपट्टी बाबत मंत्रालयात बैठक : आ. फारुख शाह

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे महानगरपालीकेच्यावतीने शहरातील मालमत्तांसाठी घरपट्टीत मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे. परिणामी धुळेकर नागरीकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. ही बाब लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांची भेट घेवून त्यांच्यासमोर धुळेकर नागरिकांची कैफियत मांडली. आ.फारुख शाह यांचे म्हणणे लक्षात घेवून प्रधान सचिव नगरविकास विभाग यांनी … The post धुळेकरांच्या मालमत्तांच्या वाढीव घरपट्टी बाबत मंत्रालयात बैठक : आ. फारुख शाह appeared first on पुढारी.

धुळेकरांच्या मालमत्तांच्या वाढीव घरपट्टी बाबत मंत्रालयात बैठक : आ. फारुख शाह

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा- धुळे महानगरपालीकेच्यावतीने शहरातील मालमत्तांसाठी घरपट्टीत मोठ्याप्रमाणात वाढ केली आहे. परिणामी धुळेकर नागरीकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. ही बाब लक्षात घेवून आ. फारुख शाह यांनी हिवाळी अधिवेशनाच्या काळात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांची भेट घेवून त्यांच्यासमोर धुळेकर नागरिकांची कैफियत मांडली. आ.फारुख शाह यांचे म्हणणे लक्षात घेवून प्रधान सचिव नगरविकास विभाग यांनी महानगरपालिकेने आकारलेल्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न निवारण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
धुळे शहर हे आर्थिक दृष्ट्या अति मागास शहर असून या शहरात मोठमोठे उद्योग धंदे नसल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. तसेच धुळे शहर हे मागासलेले असल्यामुळे शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी भरणे जिकरीचे होत आहे. धुळे शहर हद्द वाढ झाल्यामुळे शहरावर विकास कामांचा मोठा बोजा आहे, तसेच शासनाचा निधी कमी पडत असल्यामुळे शहराचा विकास होत नाही. शहरातील एम.आय.डी.सी. येथे जास्त उद्योग धंदा नसल्यामुळे शहरातील असंख्य नागरिक बेरोजगार आहेत. शहरात यापूर्वी सुद्धा घरपट्टी वाढ करण्यात आलेली होती. आज सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून घरपट्टी वसूल केली जात आहे. परंतु ही घरपट्टी वाढ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरीब नागरिकांना भरणे अशक्य होत आहे. शहराची परिस्थिती पाहता ज्याप्रमाणे महानगरपालिका ने ठराव करून घरपट्टी वाढ केलेली आहे. ती घरपट्टी वाढ आपल्या स्तरावर रद्द करून वाजवी अशी घरपट्टी लावण्यात यावी, अशी मागणी आ. फारुख शाह यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज यांची समक्ष भेट घेवून केली. त्यानुसार प्रधान सचिव नगरविकास विभाग यांनी महानगरपालीकेने आकारलेल्या वाढीव घरपट्टीचा प्रश्न निवारण्यासाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले आहेत.
हेही वाचा :

पुनर्वसन जमीन घोटाळा : दलालाकडून अनेकांची फसवणूक
तळवडे इंडस्ट्रियल बेल्टला समस्यांचे ग्रहण; नागरिक त्रस्त
Mamata Banerjee Meet PM Modi : थकीत निधीबाबत पंतप्रधान मोदी यांनी दिले ममता बॅनर्जींना आश्वासन

 
The post धुळेकरांच्या मालमत्तांच्या वाढीव घरपट्टी बाबत मंत्रालयात बैठक : आ. फारुख शाह appeared first on Bharat Live News Media.

Go to Source