Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थीती ही चिंतेची बाब आहे. राज्यात कधीही दंगली होऊ शकतात असं वातावरण केलं जात आहे. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्रात उद्धस्त होईल, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आज (दि.२०) विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.
यावेळी आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थीती बिघडवायची जेणेकरून मतदानावर फरक पडेल आणि आपलं राज्य पुढं येईल, असा टोला त्यांनी राज्यकर्त्यांना लगावला. विधीमंडळाचे सदस्य जे मंत्रिमंडळात आहेत त्यांनी कीतीपर्यंत ताणाव याला मर्यादा ठेवा. जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करता त्यांनाही सांगा जरा आवरतं घ्या. हे बोलतात म्हणून ते बोलतात यामुळे दोघांनाही राज्य सरकारच चालवतं का? अशी चर्चा सुरू आहे, अशी अप्रत्यक्ष टीका आव्हाड यांनी मंत्री छगन भूजबळ यांच्यावर केली.
राज्यात सरकार आणण्यासाठी दोन पक्ष कसे फोडले हे महाराष्ट्राला माहीत आहे. लोकशाहीची हत्या करून, पक्ष फोडून राज्य चालवायचं नसतं. लोकशाही टीकणार आहे की नाही. विरोधकांना संपवून टाकायचं, निधी अडवायचा, धमक्या द्यायच्या ही लोकशाही आहे का? असा सवालही आव्हाड यांनी यावेळी केला.
The post ‘राज्यात कधीही दंगली घडू शकतात’; आव्हाड विधानसभेत नेमकं काय म्हणाले… appeared first on Bharat Live News Media.
‘राज्यात कधीही दंगली घडू शकतात’; आव्हाड विधानसभेत नेमकं काय म्हणाले…