विक्रेत्याकडून २ लाख २५ हजारांचा पान मसाला जप्त
जळगाव- शहरातील बळीराम पेठ येथील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानात सुगंधित पान मसाला विक्रेत्यावर शहर पोलीसांनी कारवाई केली. या कारवाईत २ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बळीरामपेठ परिसरातील जळगाव फ्रेंडस ट्रान्सपोर्ट दुकानात सुगंधित पान मसाला विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, विजय पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कारवाई केली. या कारवाईत दुकानातून सुगंधित पान मसाल्याचा २ लाख २५ हजार रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोहेकॉ राजकुमार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विक्रेता दीपक महाराजसिंग यादव (वय-४२ , रा. रोहणवाडी, जळगाव ) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.
हेही वाचा :
Pimpri Crime News : कोरियन तरुणीशी गैरवर्तन; एकास अटक
Flash Back 2023 : २०२३ मधील या १० चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती; पठान जवान तर…
MP Kalyan Banerjee : उपराष्ट्रपतींची नक्कल भोवणार : कल्याण बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल
The post विक्रेत्याकडून २ लाख २५ हजारांचा पान मसाला जप्त appeared first on Bharat Live News Media.