SRK च्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘पठाण’सोबत आगामी ‘डंकी’ असे बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट घेवून येत आहे. ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तर आगामी ‘डंकी’ सुद्दा त्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजे, २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा … The post SRK च्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई appeared first on पुढारी.
SRK च्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ‘जवान’ आणि ‘पठाण’सोबत आगामी ‘डंकी’ असे बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट घेवून येत आहे. ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. तर आगामी ‘डंकी’ सुद्दा त्याच पावलावर पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजे, २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रिलीज होण्यास सध्या दोन दिवस बाकी आहेत. मात्र, अॅडव्हान्स बुकिंगमधूनच ( Dunki Advance Booking ) भरघोस अशा कमाईचे आकडे समोर येत आहेत.
संबंधित बातम्या 

Flash Back 2023 : २०२३ मधील या १० चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती; पठान जवान तर…
Salaar : प्रभासच्या ‘सालार’चा मध्यरात्रीपासून शो; तेलंगणा सरकारची परवानगी
Dunki Movie : शाहरुखच्या ‘डंकी’ च्या ‘ओ माही’ गाण्याची झलक; असा आहे ‘डंकी’ चा खरा अर्थ

अभिनेता शाहरुख खानचा आगामी ‘डंकी’ चित्रपट थियटरमध्ये प्रदर्शित होण्यास दोन दिवस शिल्लक राहिले आहे. दरम्यान चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली असून तिच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अॅडव्हान्स बुकिंगमधून ‘डंकी’ चित्रपटाने ३ लाख ६० हजार ५६४ पेक्षा जास्त तिकिटे देशात विकली गेली आहेत. चित्रपटाचे संपूर्ण देशात एकूण १२ हजार ६०७ शो मिळाले आहेत. ‘डंकी’ चित्रपटाच्या तिकीट विक्रीतून आतापर्यंत १०.२६ कोटी रूपयांची कमाई झाली आहे. ( Dunki Advance Booking )
अभिनेता शाहरुखचा ‘डंकी’ चित्रपट साऊथ स्टार प्रभासच्या ‘सालार’ ला टक्कर देणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ मध्ये शाहरुख खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, विकी कौशल यांनी भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शित होण्याआधीच चाहत्यांच्यात या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. आगामी काळात हा चित्रपट आणखीन कमाई करले असे निर्मात्यांनी अशा व्यक्त केली आहे.
The post SRK च्या ‘डंकी’चा डंका; अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींची कमाई appeared first on Bharat Live News Media.

Go to Source