पिंपरी ते निगडी विस्तारीत मेट्रो मार्गाची निविदा प्रसिद्ध
पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प या विस्तारीत मार्गाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मार्गाचा आणि तीन स्टेशनचा खर्च 910 कोटी 18 लाख इतका आहे. निविदेस मंजुरी मिळाल्यानंतर 130 आठवड्यांत हे काम पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील रिच वन आणि रिच टू मिळून एकूण 24 किलोमीटर मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली आहे.
उर्वरित 9 किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून, लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्ग प्रवाश्यांसाठी खुला करण्यात येणार आहे. स्वारगेट ते निगडी या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा टप्पा असलेल्या पिंपरी ते निगडी मार्गाच्या व्हायाडक्ट कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 910 कोटी 18 लाख खर्चाच्या पिंपरी ते निगडी या 4.519 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गास 23 ऑक्टोबर 2023 ला केंद्राची अंतिम मान्यता मिळाली आहे. या मार्गाचे काम 3 वर्षे व 3 महिन्यांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. वर्कऑर्डर दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराला 130 आठवड्यांत काम पूर्ण करण्याचे बंधन आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) असणार आहे.
निगडी टिळक चौकात आणखी एक स्टेशन-पिंपरी ते निगडी मार्गावर पिंपरी पोलिस ठाणे-चिंचवड स्टेशन, खंडोबा माळ चौक-आकुर्डी, टिळक चौक-निगडी आणि भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक-निगडी हे 4 स्टेशन असणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका भवन ते चिंचवड स्टेशनचे अंतर 1.463 किलोमीटर आहे. चिंचवड ते आकुर्डी स्टेशनमधील अंतर 1.651 किलोमीटर, आकुर्डी ते निगडी अंतर 1.062 किलोमीटर असणार आहे. निगडी ते भक्ती-शक्ती चौक स्टेशनमधील अंतर 975 मीटर असणार आहे.
काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी व्हायाडक्ट बांधण्याबरोबरच ठेकेदाराला स्टेशनचे कोनकोर्स व प्लाटफॉर्मचा स्लॅबचे काम करावे लागणार आहे. यामुळे स्टेशनच्या बांधणीचा वेळ वाचणार आहे… चिंचवड, आकुर्डी, निगडी, प्राधिकरण परिसर मेट्रोशी जोडला जाणार
पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गिकेमुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती चौक हे विभाग मेट्रो नेटवर्कला जोडले जाणार आहेत. यामुळे त्या भागातील राहणार्या हजारो नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
हेही वाचा
Pimpri Crime News : परस्पर कर्ज काढणार्या ठगाला केली अटक
Nashik News : पालकमंत्री शुक्रवारी घेणार पीकविम्याचा आढावा
अशीही एक गोष्ट : दुपारी परीक्षा अन् संध्याकाळी लग्नाची बेडी
The post पिंपरी ते निगडी विस्तारीत मेट्रो मार्गाची निविदा प्रसिद्ध appeared first on Bharat Live News Media.