२०२३ मधील या १० चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती; पठान जवान तर…

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडच्या बादशाहने २०२३ हे वर्ष आपल्या नावावर लॉक केलं. (Flash Back 2023 ) पठाण, जवान यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२३ हे वर्ष हिंदी चित्रपटासाठी नवसंजीवनी घेऊन आले. कोविडच्या काळानंतर चित्रपटसृष्टीसाठी अनेक चिंता , निराशा वाढली होती. पण, त्यानंतर ओटीटीचा प्रभाव वाढलाय पण, बॉलिवूडच्या अऩेक अभिनेत्यांनी पुन्हा बॉक्स ऑफिसवर परतत … The post २०२३ मधील या १० चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती; पठान जवान तर… appeared first on पुढारी.

२०२३ मधील या १० चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती; पठान जवान तर…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडच्या बादशाहने २०२३ हे वर्ष आपल्या नावावर लॉक केलं. (Flash Back 2023 ) पठाण, जवान यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२३ हे वर्ष हिंदी चित्रपटासाठी नवसंजीवनी घेऊन आले. कोविडच्या काळानंतर चित्रपटसृष्टीसाठी अनेक चिंता , निराशा वाढली होती. पण, त्यानंतर ओटीटीचा प्रभाव वाढलाय पण, बॉलिवूडच्या अऩेक अभिनेत्यांनी पुन्हा बॉक्स ऑफिसवर परतत हिंदी चित्रपटसृष्टीची गुणवत्ता पुन्हा वाढवली. (Flash Back 2023)
या वर्षातील १० सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटांचा फ्लॅशबॅक पुढीलप्रमाणे-
गुलमोहर
गुलमोहरमध्ये दिग्गज कलाकारांना घेऊन चित्रपट बनवण्यात आला. शर्मिला टागोर आणि नेहमी आवडणाऱ्या अमोल पालेकर यांच्या भूमिकेमुळे उत्कृष्ट कलाकारांचा अभिनय पाहायला तर मिळालाच शिवाय, भारतातील एकत्र कुटुंबांमधील चिंताही समोर आली. सुंदर, मोहक आणि प्रभावशाली, कौटुंबिक संबंध हा एक मार्मिक छोटा चित्रपट होता. अंदाजानुसार, यावर्षी मनोज वाजपेयीने सादर केलेले अनेक सीन्स उत्तम परफॉर्मन्स देऊन गेले.
लस्ट स्टोरीज २
लस्ट स्टोरीज २ हा पहिल्या भागाप्रमाणे हिट ठरला. कोंकणा सेन शर्मा, तितोलमा शोम, अमृता सुभाष यांच्यातील असामान्य अभिनय एक धाडसी कथा घेऊन मोठ्या पडद्यावर अवतरला.
तरला
तरला हे एक बायोपिक होते. मध्यवर्गीय स्वयंपाक करणाऱ्या एका फूड लेखिका, शेफ महिलेची ही कथा होती. तरला दलाल ही भूमिका बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशीने साकारली होती. तरला दलाल यांच्या पदार्थांनी त्यांची लोकप्रियता तर वाढवलीच. शिवाय, व्हेजिटेरियन फूड्सची टेस्टदेखील बदलली. पाक कलेतील योगदानासाठी तरला दलाल यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तरला दलाल यांची पहिली रेसिपी बटाटा मुसल्लम (Batata Musallam) इतकी लोकप्रिय झाली होती की, ही रेसिपी शिकण्याऱ्यांची रांग लागली होती.
रॉकी और रानी की प्रेम कहानी
करण जोहर आलिया भट्ट आणि रणवीर सिंहला घेऊन रॉकी और राणी की प्रेम कहानी चित्रपट घेऊन आला होता. या चित्रपटाची कथा काहीशी वेगळी होती. आलिया आणि रणवीरची केमिस्ट्री तसेत धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यातील किसींग सीनने चित्रपटाच्या स्टोरीचा प्लॉटचं बदलला.
ओएमजी २
अक्षय कुमारच्या चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट यादीतील उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ओएमजी २ होय. ज्या चित्रपटात अक्षय देवाच्या भूमिकेत आहे. पंकज त्रिपाठीनेही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारलीय. गदर २ शी टक्कर झाल्यानंतरदेखील अक्षयच्या चित्रपटाने भरघोस कमाई केली. सामाजिक संदेश देणारा ओएमजी २ चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज झाला होता. ओएमजी 2 ने बॉक्स ऑफिसवर जवळपास १५० कोटींचा बिझनेस केला.
जवान
या वर्षातील शाहरुख खानने सुपरहिट चित्रपटाने विशेष स्थान मिळवले. अनेक प्रकारच्या भूमिका साकारत शाहरुखने पुन्हा एकदा सिद्ध केले की, तो बॉलिवूडचा बादशाह आहे. ग्लॅमर, ॲक्शन, डायरेक्शन, कास्ट, वीएफएक्स सगळ्याच पातळींवर जवान ब्लॉकबस्टर ठरला.
12th फेल
विधू विनोद चोप्रा 12th फेल या चित्रपटासह पडद्यावर परतले. पण, या चित्रपटाची फारशी प्रसिद्धी झाली नसली, तरी एका यशस्वी आयपीएस अधिकाऱ्याचा संघर्षमय प्रवास दाखवण्यात आलाय. विक्रांत मेस्सी हा मुख्य भूमिकेत आहे.
थ्री ऑफ अस
अविनाश अरुण दिग्दर्शित थ्री ऑफ अस एका कमकुवत महिलेची कहाणी आहे. शेफाली शाह मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये जयदीप अहलावत देखील आहे. हा चित्रपट एका रिलेशनशिप ड्रामावर आधारित आहे. IFFIच्या ५३ व्या इव्हेंटमध्ये शेफालीने आपल्या आगामी चित्रपटावर बातचीत केली होती.
ॲनिमल
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. रणबीरच्या हटके अभिनयाने सर्वांनाच अचंबित केले. अभिनेता रणबीर कपूरच्या करिअरमधील हा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला तर रश्मिका मंदान्ना हिचा बॉलिवूड डेब्यू यशस्वी ठरला.
जोरम
जोरम एक थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट देवाशीष मखीजाद्वारा लिखित आणि दिग्दर्शित आहे. यामध्ये मनोज वाजपेयी , तनिष्ठा चॅटर्जी आणि स्मिता तांबे आहे.
The post २०२३ मधील या १० चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चलती; पठान जवान तर… appeared first on Bharat Live News Media.

Go to Source