जालना : अंबडमधे ओबीसींचा एल्गार; सभेची जय्यत तयारी

जालना : अंबडमधे ओबीसींचा एल्गार; सभेची जय्यत तयारी

अंबड; पुढारी वृत्तसेवा  : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा अंबड शहरातील धाईत नगर मैदानावर दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी होत आहे. लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव देशभरातून या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,माजी मंत्री पंकजा मुंडे,रासपचे महादेव जानकर,शब्बीर अन्सारी,आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित राहणार आहेतअसुन सभेच्या निमित्ताने राज्यातील ओबीसी आपली एकजूट दाखवणार आहे. महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातुन अंबड येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेला लाखो ओबीसी येणार.
१) ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये. २) बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगनना करण्यात यावी. ३)मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी. ४) खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.५) ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जी. आर ताबडतोब रद्द करावा. ६ )बंजारा समाजाचा ST प्रवर्गात समावेश करुन तात्काळ ST चे दाखले वाटप करण्यात यावे.७)धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती आरक्षणाची (ST )अमलबजावणी करण्यात यावी अशा आदी मागण्यांचा समावेश आहे.
विविध मदतकार्यासाठी स्वंयसेवक टीम तयार करण्यात आली आहे प्रत्येक टीमला कामाची जबाबदारी वाटुन दिली आहे.सभेला येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची ओमशांती ग्राऊंड,शारदा नगर ग्राऊंड फेडरेशन ग्राऊंड,भालचंद्र रेसीडंसी, तुळजाभवानी मंदिर परिसर,दत्ताजी भाले ग्राऊंड वर केलेली आहे. घनसावंगी  फाटा,लालवाडी महालक्ष्मी पेट्रोलपंप,मार्डी पाचोड,वडीगोद्री,पाचोड रोड,अंबड आदी ठिकाणी नाश्ता व्यवस्था करण्यात आली आहे.पिण्याच्या पाण्याची सभेच्या ठिकाणी तसेच ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आ हे.
एस.पी,तीन अॅडीशनल एस.पी,सहा डि.वाय.एस.पी,एक हजार पेक्षा पोलीस अमलदार, होमगार्ड, एस.आर.पी,रँपीड अँक्शन फोर्सच्या बंदोबस्तात ओबीसी एल्गार सभा संपन्न होणार आहे.
The post जालना : अंबडमधे ओबीसींचा एल्गार; सभेची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

अंबड; पुढारी वृत्तसेवा  : ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा अंबड शहरातील धाईत नगर मैदानावर दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी होत आहे. लाखोच्या संख्येने ओबीसी समाज बांधव देशभरातून या सभेसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते.सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार,माजी मंत्री पंकजा मुंडे,रासपचे महादेव जानकर,शब्बीर अन्सारी,आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित राहणार आहेतअसुन सभेच्या …

The post जालना : अंबडमधे ओबीसींचा एल्गार; सभेची जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Go to Source