माेठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र!
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका बसला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणी कोलोरॅडो राज्याच्या मुख्य न्यायालयाने ट्रम्प यांना अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकती रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख दावेदार मानले जाणारे ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्रपतीपदासाठी राज्याच्या प्राथमिक मतदानातून काढून टाकले आहे.
अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 14 व्या घटनादुरुस्तीच्या कलम 3 चा वापर राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी केला गेला आहे. कोलोरॅडो राज्याच्या मुख्य न्यायालयाने आपल्या 4-3 अशा बहुमताने झालेल्या निर्णयात म्हटले आहे की, १४ व्या घटनादुरुस्तीच्या कलम 3 अंतर्गत ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्यास अपात्र आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात निकाल देणाऱ्या न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नियुक्ती डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्यपालांनी केली होती.
Colorado Supreme Court removes Donald Trump from state’s 2024 ballot
Read @ANI Story | https://t.co/QUD3W0yGUF#DonaldTrump #US #ColaradoSupremeCourt pic.twitter.com/vTuD1LDhz5
— ANI Digital (@ani_digital) December 20, 2023
6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल (अमेरिकेची संसद) वर झालेल्या हल्ल्यासाठी ट्रम्प यांनी जमावाला हिंसाचारासाठी चिथावणी दिली होती, असे कनिष्ठ न्यायालयाने म्हटले होते; परंतु ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी उभे राहण्यापासून रोखले जाऊ शकत नाही कारण संविधानाच्या त्या कलमात अध्यक्षपदाचा समावेश आहे की नाही हे स्पष्ट नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले हाेते. आता कनिष्ठ न्यायालयाचा हा निकाल कोलोरॅडो राज्याच्या मुख्य न्यायालयाने रद्द केला आहे.
आता सर्वोच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार
आता 4 जानेवारीपर्यंत अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर निर्णय देणार आहे. रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प नामांकनाच्या शर्यतीत राहू शकतात की नाही हे आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक; 20 मिनिटांनी जामिनावर सुटका
Donald Trump Secret Document Case : गोपनीय कागदपत्रे प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांचे न्यायालयात आत्मसमर्पण; म्हणाले…
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ; लैंगिक शोषण प्रकरणी दोषी; 41 कोटींचा दंड
The post माेठी बातमी : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी अपात्र! appeared first on Bharat Live News Media.