विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; या वेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. त्या … The post विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on पुढारी.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची पाहणी केली; या वेळी त्यांनी अभिवादन सोहळ्यासाठी सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी पुणे शहरचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्यासह वाहनतळाची जागा आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पोलिस सहआयुक्त रामनाथ पोकळे, पिंपरी चिंचवडचे पोलिस सहआयुक्त डॉ. संजय शिंदे आदी उपस्थित होते.
1 जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणार्‍या अनुयायांना सर्व सोयीसुविधा मिळतील यादृष्टीने पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, विद्युत प्रकाश व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, गर्दीचे व वाहतुकीचे नियोजन, आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन वाहनांची व्यवस्था, हिरकणी कक्ष, आपत्ती व्यवस्थापन याबाबत केलेल्या पूर्वतयारीची माहिती त्यांनी घेतली.
दरवर्षी अभिवादनासाठी येणार्‍या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेऊन पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय करावी. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीच्या नियोजनाबाबत सूक्ष्म नियोजन करावे. वाहतुकीचे नियोजन करून त्याची नागरिकांना माहिती द्यावी, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी दिल्या.
हेही वाचा

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदारांना समन्स
‘राज्य उत्पादन शुल्क’कडून 82 लाखांचे विदेशी मद्य जप्त
पात्र ठरवूनही दहा हजार शाळा अनुदानापासून वंचित

The post विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source