जळगाव : विटनेर येथे टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार
जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील विटनेर येथे नेरीकडून म्हसावदकडे जाणा-या केमिकल टँकरने रस्त्यावरून म्हैस घेऊन निघालेल्या शेतकऱ्याला धडक दिली. या अपघातात शेतकरी व म्हैस जागीच ठार झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने सुमारे तीन तास वाहतुक ठप्पं झाली होती.
तालुक्यातील नेरी- म्हसावद रस्त्यावर विटनेर येथे आज (दि. १९) दुपारच्या सुमारास केमिकल्सने भरलेल्या टँकरने (क्र. जी.जे.१२. बी.व्ही.७४७५) म्हशी चारवून घरी निघालेल्या शेतकऱ्याला धडक दिली. सुकलाल पंडित सोनवणे असे या व्यक्तीचे नाव आहे. म्हशीसह येत असताना जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती गावासह परिसरात वाऱ्याच्या वेगात पसरल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुमारे तीन तास रस्त्यावर ठिय्या दिल्याने वाहतुक पुर्णतः ठप्प झाली होती. या रस्त्यावर नेहमीच असे छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिक आक्रमक झाले आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलीसासह वरीष्ठ अधीकारी दाखल झाले होते.
The post जळगाव : विटनेर येथे टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या जळगाव : विटनेर येथे टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार
जळगाव : विटनेर येथे टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील विटनेर येथे नेरीकडून म्हसावदकडे जाणा-या केमिकल टँकरने रस्त्यावरून म्हैस घेऊन निघालेल्या शेतकऱ्याला धडक दिली. या अपघातात शेतकरी व म्हैस जागीच ठार झाले. एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याने सुमारे तीन तास वाहतुक ठप्पं झाली होती. तालुक्यातील नेरी- म्हसावद रस्त्यावर विटनेर येथे …
The post जळगाव : विटनेर येथे टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार appeared first on पुढारी.