सांगली : पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटीलला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जत; पुढारी वृत्तसेवा : जत पूर्व भागातील पांढरेवाडी गावातील ओढापात्रातील अवैध वाळू वाहतुकीची अप्पर तहसिलदारांना माहिती देणाऱ्या पोलीस पाटिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरीबडची-संख रस्त्यावर घडली. याबाबतची फिर्याद पांढरेवाडीचे पोलीस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे यांनी दिली. पोलिसांनी … The post सांगली : पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटीलला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

सांगली : पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटीलला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

जत; Bharat Live News Media वृत्तसेवा : जत पूर्व भागातील पांढरेवाडी गावातील ओढापात्रातील अवैध वाळू वाहतुकीची अप्पर तहसिलदारांना माहिती देणाऱ्या पोलीस पाटिला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. १८) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दरीबडची-संख रस्त्यावर घडली. याबाबतची फिर्याद पांढरेवाडीचे पोलीस पाटील धर्मराज बाळाप्पा शिंदे यांनी दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी श्रीमंत कामा करपे, मल्हारी जयाप्पा करपे, जयाप्पा कामा करपे, महादेव बाबू तांबे सर्व (रा. पांढरेवाडी ता. जत) यांच्यावर गुन्हा दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संखचे अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांनी पोलीस पाटील शिंदे यांना अवैध वाळू उत्खनन संदर्भात अप्पर कार्यालयाला माहिती द्यावी. अश्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पांढरेवाडी हद्दीतील दरीबडचीकडे जाणाऱ्या ओढ्यामध्ये अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे समजले. या ठिकाणी पोलीस पाटील धर्मराज शिंदे गेले असता त्यांना ट्रॅक्टरचा आवाज आला .यावेळी याबाबतची माहिती सांगण्यासाठी अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे यांना फोन करत होते.परंतु याचवेळी एका बोलेरो गाडीतून श्रीमंत करपे, मल्हारी करपे, जायाप्पा करपे, महादेव तांबे आले व अगोदर पण म तहसील कार्यालयाला माहिती दिल्याने आमचे नुकसान झाले आहे. आता फोन लावायचा नाही म्हणून अप्पर तहसीलदार यांना फोन लावू दिला नाही. एकंदरीत त्यांच्याकडून सरकारी कामात अडथळा आणल्याचे कृत्य झाले आहे. ओढ्यामध्ये आमचाच ट्रॅक्टर आहे. याबाबत तहसिलदार साहेबांना कळवू नका. असे सांगत श्रीमंत करपे त्यांच्या सहकारी यांनी गाडीतून आणलेल्या काट्याने मारहाण करत जखमी केले आहे व तसेच भविष्यात अशी माहिती पोलिसात दिल्या जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.
The post सांगली : पांढरेवाडीतील अवैध वाळू वाहतूक रोखल्याने पोलीस पाटीलला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source