Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा आज केली. या घोषणेनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलत असताना मराठा आरक्षणासाठी २४ तारखेनंतर एक तासही वाढवून देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
यावेळी बोलताना म्हणाले की, मी काय बोलतोय हे ६ कोटी मराठ्यांना माहित आहे. मागासवर्ग आयोगाची मागणी आमची नाही. २४ डिसेंबरच्या आधी कायदा करावा. एकतर आरक्षण नाहीतर आंदोलन असा इशारा देत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे २३ डिसेंबर रोजी स्पष्ट करणार असे सांगितले. दरम्यान यावेळी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या नातेवाईकांना आरक्षण कसे देणार? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.
The post जरांगे पाटील डेडलाईनवर ठाम! ‘एकतर आरक्षण नाहीतर आंदोलन’ appeared first on Bharat Live News Media.
जरांगे पाटील डेडलाईनवर ठाम! ‘एकतर आरक्षण नाहीतर आंदोलन’