मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा; विशेष अधिवेशन घेणार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.१९) विधानसभेत केली.
मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, समाजाला आरक्षण देण्याबाबत मी जाहिरपणे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन तसे वचन दिले आहे. आणि आजही मी त्यावर ठाम आहे. मराठा समाजाशिवाय इतर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर मी अशीच शपथ घेतली असती, त्यामुळे मी कुठेही मागे हटणार नाही, अशी ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली.
#विधानसभा |
राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल. मराठा समाजाला हे आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची मी…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 19, 2023
हेही वाचा
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी दिल्लीत आवाज उठवावा : संभाजीराजे छत्रपती
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील
मराठा आरक्षणप्रश्नी आणखी थोडा वेळ वाढवून द्या : जरांगे-पाटील यांच्याकडे शिष्टमंडळाची मागणी
The post मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा; विशेष अधिवेशन घेणार appeared first on Bharat Live News Media.