Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षांचे खासदार संसद परिसरात निदर्शने करत होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत गांधी पुतळ्यासमोर धरणेही धरले. यानंतर ते संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चर्चा करत होते. त्यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. या कृतीवर उपराष्ट्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Jagdeep Dhankhar
ही कृती लज्जास्पद असल्याचे सांगून उपराष्ट्रपती म्हणाले की, एक खासदार माझी खिल्ली उडवत आहेत. आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे, हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. खालच्या पातळीवर उतरण्याला कोणतीही मर्यादा नाही. एक मोठा नेता खासदाराच्या असंसदीय वर्तनाचे व्हिडीओ चित्रिकरण करतो. सर्वांपेक्षा मोठे नेते आहेत. त्यांना सद्बुद्धी यावी, असा टोला त्यांनी लगावला. या कृतीमुळे माझी अवहेलना झाली आहे. माझ्या पदाची खिल्ली उडवली गेली. माझ्या कृषी पार्श्वभूमीची खिल्ली उडवली गेली, अशा शब्दांत उपराष्ट्रपतींनी आपला संताप व्यक्त केला. Jagdeep Dhankhar
जेव्हा टीएमसीचे खासदार मिमिक्री करत होते. तेव्हा राहुल गांधी, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, मनोज झा, डी राजा, कार्ती चिदंबरम असे अनेक ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते.
१३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेबाबत दोन्ही सभागृहात पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावे, या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. या गदारोळानंतर १४ डिसेंबरला टीएससी खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतील हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी काही खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील १४१ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.
ज्या भाजप खासदाराच्या पासवर संसदेत दोन तरुणांनी घुसखोरी केली. त्या खासदारावर कारवाई करण्याऐवजी सरकार आमच्यावरच कारवाई करत आहे, असे विरोधी खासदारांनी म्हटले आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे.
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023
हेही वाचा
TMC MP Mimics : धनखड यांची नक्कल, राहुल गांधींकडून शूट; संसद परिसरात नेमकं काय घडलं?
PM Modi On Opposition’s: संसद सुरक्षा भंग प्रकरणात विरोधकांकडुन आरोपींचे समर्थन दुर्दैवी-पंतप्रधान
Sharad Pawar | शरद पवारांचे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र, केली ‘ही’ मागणी
The post ‘त्या’ खासदाराच्या मिमिक्रीवर उपराष्ट्रपती संतापले, म्हणाले… appeared first on Bharat Live News Media.