डिजिटल नको, छापील लग्नपत्रिकाच हवी !

पिंपरी : व्हॉटस् अ‍ॅपवर पत्रिका पाठवलीय… लग्नाला नक्की यायचंय..! अशा पद्धतीच्या कोरड्या आमंत्रणामुळे शुभकार्यात उपस्थित राहणार्‍या पाहुण्यांची संख्या गेल्या एक-दोन वर्षांत रोडावली होती. त्यामुळे आता पुन्हा छापील पत्रिकांची क्रेझ सुरू झाली आहे. छापील पत्रिकांची मागणी 30 ते 40 टक्क्यांनी वाढली असून, अ‍ॅक्रॅलिक, ड्रायफूट अन् दोरी ओढताच वधू-वराचे फोटो दिसणार्‍या भन्नाट पत्रिकांची विक्री होत आहे. तुळशी … The post डिजिटल नको, छापील लग्नपत्रिकाच हवी ! appeared first on पुढारी.

डिजिटल नको, छापील लग्नपत्रिकाच हवी !

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी : व्हॉटस् अ‍ॅपवर पत्रिका पाठवलीय… लग्नाला नक्की यायचंय..! अशा पद्धतीच्या कोरड्या आमंत्रणामुळे शुभकार्यात उपस्थित राहणार्‍या पाहुण्यांची संख्या गेल्या एक-दोन वर्षांत रोडावली होती. त्यामुळे आता पुन्हा छापील पत्रिकांची क्रेझ सुरू झाली आहे. छापील पत्रिकांची मागणी 30 ते 40 टक्क्यांनी वाढली असून, अ‍ॅक्रॅलिक, ड्रायफूट अन् दोरी ओढताच वधू-वराचे फोटो दिसणार्‍या भन्नाट पत्रिकांची विक्री होत आहे.

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होतो. त्यापाठोपाठ लग्नाचे मुहूर्त काढण्याच्या तयारीला वेग येतो. त्यामुळे आता लहान मोठ्या गोष्टी परंपरेने करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. कोरोनाकाळात ऑनलाईनला प्राधान्य दिले जात होते. त्या वेळी दहा किंवा पंधरा नागरिकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडत होता. मात्र, आता पुन्हा नव्याने लग्नसराईमध्ये जुन्या पध्तीने विवाह सोहळा पार पडत आहे. उच्च, मध्यमवर्गाकडून आपल्या बजेटप्रमाणे छापील पत्रिकेला पसंती देताना दिसत आहे.
कोरोनानंतर मागणी वाढली
कोरोना काळात डिजिटल स्वरुपातील लग्नपत्रिकेला मागणी वाढली होती. त्या वेळी डिजिटल स्वरूपातील लग्नपत्रिका व्हॉट्सअप क्रमांकावर पाठविण्यात येत होत्या. अशा वेळी लांबच्या पल्ल्यावरील नातेवाईक लग्नसोहळ्यात उपस्थित राहत नसल्यामुळे पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन नात्यातील आपलेपणा वाढविण्यासाठी छपाई लग्नपत्रिकेला पसंती दिली जात आहे.
पत्रिकांचे वेगळेपण
बाजारात हव्या तशा लग्नपत्रिका उपलब्ध आहेत. क्रेझप्रमाणे पत्रिकेला मागणी वाढली आहे. त्यामध्ये बॅगलग्न पत्रिका, बैगशैली पुष्य, लग्नपत्रिका होल्डर, अ‍ॅक्रॅलिक, ड्रायफूट , लेझर कटींग, मेटल प्रिंटिंग. कलरेग डिजाईन, बॅक पॅटन, फ्लोरा डिजाईन, अशा विविध डिजाईंना मागणी वाढली आहे. तसेच व्यावसायिकांच्या दुकानात गर्दी वाढत आहे.
लग्नपत्रिकेचे दर
लग्नपत्रिकांमध्ये प्रत्येक पत्रिकेचे दर वेगवेगळे आहेत. पत्रिकेच्या कागदावरुन व कलरिंग शाईच्या किंमतीवर दर ठरविली जातात. बॅग पत्रिका 500 ते 550 ड्रायफूट 250 ते 400, 500 ते 1000 अशा अनेक पत्रिकांचे दर वेगवेगळे आहेत. लग्नसराईचा सीजन असल्यामुळे
लग्नपत्रिकेला 30 ते 40 टक्के मागणी वाढली आहे.
रंगबिरंगी शाईच्या पत्रिकेला मागणी
काळ्या शाईच्या पत्रिकेला इतकी मागणी नसून रंगबिरंगी शाईच्या पत्रिकेला अधिक खरेदीला प्रधान्य दिले जात आहे. काळर्या शाईच्या पत्रिकेचे दर 300 किले केजी एवढे असून, रंगबिरंगी 400 किलो केजी आहे. काळ्या शाईच्या पत्रिकेला पूर्वी खूप मागणी होती. मात्र आता क्रेझप्रमाणे रंगबिरंगी पत्रिकेला पसंती आहे. लग्नपत्रिका 800 ते 5000 पर्यंत आहे.

कोरोना काळता डिजिटल स्वरुपाची लग्नपत्रिकेला मागणी वाढली होती. मात्र आपली प्रथा, परंपरा मागे पडू नये. तसेच प्रत्यक्ष भेटून पत्रिका दिल्याने नात्यातील गोडवा वाढतो. पाहुणे मंडळीदेखील मोठ्या संख्येने लग्नसोहळ्याला उपस्थित राहतात.

– मनीष नांगरे

छपाई लग्नपत्रिका देवापुढे ठेवता येते. आपल्या घरातील मंदिरांमध्ये तसेच आपल्या कुलदेवतांच्या समोर छपाई पत्रिका ठेवू शकतो. मात्र, आनलाईन पत्रिका ठेवता येत नाही. लग्नसोहळा संपूर्ण परंपरेने पार पडला पाहिजे.

– माधुरी शिंदे महिला

हेही वाचा

Mimicking Rajya Sabha Chairman: धनखड यांची नक्कल, राहुल गांधींकडून शूट; संसद परिसरात नेमकं काय घडलं?
Weather update : उत्तरेतील राज्ये गारठली तर दक्षिणेला पावसाने झोडपलं
Pune : आळेफाटा परिसरात मालवाहू कंटेनरला आग

The post डिजिटल नको, छापील लग्नपत्रिकाच हवी ! appeared first on Bharat Live News Media.

Go to Source