मालवण: शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट : ठाकरे गटाचे निवेदन

मालवण : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज (दि.१९) मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे गट … The post मालवण: शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट : ठाकरे गटाचे निवेदन appeared first on पुढारी.

मालवण: शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट : ठाकरे गटाचे निवेदन

मालवण : Bharat Live News Media वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या राजकोट किल्ला तटबंदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आज (दि.१९) मालवण तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच कारवाई न झाल्यास ठाकरे गट व शिवप्रेमी यांच्यातर्फे मालवण तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. Sindhudurg News
याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार गंगाराम कोकरे यांना सादर करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, सन्मेष परब, उमेश मांजरेकर, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, यशवंत गावकर, उमेश चव्हाण, दत्ता पोईपकर, प्रसाद चव्हाण, सचिन गिरकर, चिंतामणी मयेकर, हेमंत मोंडकर आदी उपस्थित होते. Sindhudurg News
मालवण शहरातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. पुतळ्याच्या सभोवताली बांधण्यात आलेली तटबंदी, चौथरा ढासळत चालली आहे. त्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणे म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान केला सारखा आहे. केवळ पैसे कमावण्यासाठी संबंधितानी हे काम केले असेल तर ते चुकीचे आहे, तटबंदी साठी वापरण्यात आलेला चिरा देखील कमी दर्जाचा असून बांधकामातील प्रक्रियेनुसार दगडांची सांगड न घालताच तटबंदी उभारण्यात आली आहे. त्यामुळे तटबंदीचे दगड ढासळत आहेत, असे यावेळी हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी सांगत या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट करून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
हेही वाचा 

सिंधुदुर्गात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तोकडी यंत्रणा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी ते मालवण परिसरात अवतरणार फिल्मसिटी

सिंधुदुर्ग : राजकोट येथील शिवरायांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी राज्‍यभरातील नागरिकांची गर्दी

The post मालवण: शिवरायांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम निकृष्ट : ठाकरे गटाचे निवेदन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source