धनखडांची नक्कल, राहुल गांधींकडून शूट; संसद परिसरात नेमकं काय घडलं?
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: संसद घुसखोरी प्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांकडून गदारोळ घालण्यात आल्याने विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईने निलंबित खासदार आक्रमक झाले. आज (दि.१९) निलंबित खासदारांनी संसद परिसरातील मकरद्वार येथे ठिय्या मांडला. यावेळी तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची नक्कल केली. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी या नक्कलेचे चित्रिकरण केले. या प्रकारावरून राज्यसभा सभापती जगदीश धनखड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (TMC MP Mimics)
TMC MP Mimics: राहुल गांधींकडून शूट
संसदेच्या दोन्ही सभागृहातील निलंबित खासदारांनी संसद परिसरातील मकरद्वार येथे निदर्शने केली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांची नक्कल केली. यावरून विरोधी पक्षाचे खासदारांमध्ये हशा पिकला. या संपूर्ण प्रसंगाचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी माेबाईल फाेनवर शूट केले. या संपूर्ण प्रकारावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (TMC MP Mimics)
हा प्रकार लज्जास्पद, हास्यास्पद आणि अस्वीकार्य : जगदीप धनखड
तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभा सभापती धनखड यांची नक्कल केली आणि काँग्रेसचे राहुल गांधी यांनी ते शूट केले. हा प्रकार लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली आहे. या घटनेवरून राज्यसभा सभापती जगदीप धनखड संतापल्याचे पाहायला मिळाले. ” एक खासदार थट्टा करत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेची व्हिडिओग्राफी करत आहे, हे “लज्जास्पद, हास्यास्पद, अस्वीकार्य आहे” असे त्यांनी म्हटले आहे. (TMC MP Mimics)
संसद परिसरात आंदोलन, निदर्शने
बुधवारी १३ डिसेंबर रोजी लोकसभेची कार्यवाही सुरू असताना लाेकसभेत प्रेक्षक गॅलरीतून उडी घेत घुसखाेरीचा प्रयत्न केला. या प्रकारावरुन संसद सभागृह सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला हाेता. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक झालेले पाहिला मिळत आहे. दरम्यान, विरोधकांची घाेषणाबाजी आणि गदारोळामुळे अनेकवेळा संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यावरून सत्ताधारी सरकारविरोधात निलंबित खासदारांनी मकरद्वार येथे निदर्शने केली. तर विरोधी पक्षांच्या इतर खासदारांनी संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केले आहे.
#WATCH | TMC MP Kalyan Banerjee mimics Rajya Sabha Chairman Jagdeep Dhankhar in Parliament premises pic.twitter.com/naabLIzibY
— ANI (@ANI) December 19, 2023
हेही वाचा:
Supriya Sule Suspension | ब्रेकिंग : लोकसभेतून सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे निलंबित
Sharad Pawar | शरद पवारांचे राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांना पत्र, केली ‘ही’ मागणी
Winter Session 2023: संसदेत विरोधकांची घोषणा आणि फलकबाजी; दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब
The post धनखडांची नक्कल, राहुल गांधींकडून शूट; संसद परिसरात नेमकं काय घडलं? appeared first on Bharat Live News Media.