सांगली : ढालगावात दिव्यांग शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
नागज; Bharat Live News Media वृत्तसेवा : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रदीप ऊर्फ बाबूराव प्रकाश देसाई (वय 9) या दिव्यांग शाळकरी मुलाचा ओढ्यावरील बंधार्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
प्रदीप एकुलता एक होता. तो ढालगाव येथील देसाई वस्ती पूर्व जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. सकाळी तो शाळेला गेला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर तो घरी जात असताना, घरापासून जवळच असलेल्या ओढापात्रात पाण्यातील मासे पकडण्यासाठी टाकलेली जाळी बघण्यासाठी बंधार्याजवळ गेला व पाण्यात पडला. दिव्यांग असल्याने पाण्यात पडल्यानंतर खोलवर पाण्यात बुडाला. काही वेळाने त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आहे.
The post सांगली : ढालगावात दिव्यांग शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू appeared first on Bharat Live News Media.


Home ठळक बातम्या सांगली : ढालगावात दिव्यांग शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
सांगली : ढालगावात दिव्यांग शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
नागज; पुढारी वृत्तसेवा : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील प्रदीप ऊर्फ बाबूराव प्रकाश देसाई (वय 9) या दिव्यांग शाळकरी मुलाचा ओढ्यावरील बंधार्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. प्रदीप एकुलता एक होता. तो ढालगाव येथील देसाई वस्ती पूर्व जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत होता. सकाळी तो शाळेला गेला होता. दुपारी दोन वाजण्याच्या …
The post सांगली : ढालगावात दिव्यांग शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.