मिरज विधानसभेसाठी इच्छुकांचा शड्डू

मिरज :  लोकसभेपूर्वीच मिरज विधानसभा निवडणुकीसाठी मिरजेत अनेकांनी शड्डू ठोकला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मुख्य विरोधक बनण्यासाठी विरोधी पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठीच त्यांची आता कुस्ती सुरू झाली आहे. पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मिरज विधानसभा मतदारसंघ पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. भाजपच्या उमेदवारीवर सलग चौथ्यांदा आमदार बनलेल्या खाडे यांनी … The post मिरज विधानसभेसाठी इच्छुकांचा शड्डू appeared first on पुढारी.

मिरज विधानसभेसाठी इच्छुकांचा शड्डू

जालिंदर हुलवान

मिरज :  लोकसभेपूर्वीच मिरज विधानसभा निवडणुकीसाठी मिरजेत अनेकांनी शड्डू ठोकला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मुख्य विरोधक बनण्यासाठी विरोधी पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. उमेदवारी मिळवण्यासाठीच त्यांची आता कुस्ती सुरू झाली आहे. पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मिरज विधानसभा मतदारसंघ पंधरा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे. भाजपच्या उमेदवारीवर सलग चौथ्यांदा आमदार बनलेल्या खाडे यांनी मिरजेत सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्ट्रिक केली. ते यापूर्वी समाज कल्याण विभागाचे मंत्री होते. सध्या ते कामगार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पाच वर्षांमध्ये त्यांची ताकद वाढलेली दिसते, मात्र निवडणुकीचे दिवस जवळ येतील तसे त्यांना आव्हाने उभी करण्याचे काम सध्या मतदारसंघात सुरू आहे.
मिरज मतदारसंघात नऊ वेळा काँग्रेस, दोन वेळा जनता दल, एकदा अपक्ष आमदार निवडून आला होता. 2009 मध्ये भाजपतर्फे खाडे निवडून आले. तेव्हापासून हा भाजपचा किल्ला म्हणून ओळखला जातो. 2009 पासून मिरज मतदारसंघ हा राखीव झाला. 2009 च्या निवडणुकीत बाळासाहेब होनमोरे काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढले होते. त्यावेळी त्यांचा 54 हजार 456 मतांनी पराभव झाला होता. 2009 च्या निवडणुकीमध्ये भाजपबरोबर शिवसेना होती.
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आणि मिरजेत चांगली मते घेतली होती. काही दिवसांपूर्वी वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत दौरा केला होता. वंचित कडून युवक नेते इंद्रजीत घाटे यांचा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीचा शरद पवार गट, शिवसेनेचा ठाकरे गट आघाडीमध्ये आहे. वंचित देखील आघाडीच्या उंबरठ्यावर आहे.
यापूर्वी काँग्रेसमधून लढलेले सिद्धार्थ जाधव यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मिरज मतदार संघ हा पूर्वी शिवसेनेकडे होता. त्यामुळे आता त्यांनी आघाडीमध्ये मिरजेवर दावा केला आहे. 2009 मध्ये काँग्रेस, 2014 मध्ये राष्ट्रवादीमधून आणि 2019 च्या निवडणुकीत शेतकरी पक्षाकडून लढलेले बाळासाहेब होनमोरे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मिरजेवर त्यांनी दावा केला आहे. शिवाय वंचितने देखील मिरजेवर दावा केला आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात असणार्‍या आघाडी कडून आघाडीतील सर्व पक्षांकडून मिरजेच्या उमेदवारीबाबत दावा करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण होणार आहे.
भाजप विरोधी पक्षातील उमेदवारांना आघाडीमध्ये राहून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या संघर्ष केला जात आहे. उमेदवारी फायनल झाल्यानंतर भाजपशी लढा दिला जाणार आहे. आघाडीची उमेदवारी मलाच असे सर्व इच्छुक दावा करीत आहेत. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
खाडे यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता. तो मिटल्याचे दाखवले जात असले तरी अंतर्गत धुसफूस मात्र सुरूच आहे. खाडे मंत्री झाल्यानंतर वनखंडे यांना डावलले जात असल्याचा आरोप आहे. खाडे यांच्यासाठी मात्र या निवडणुकीमध्ये वनखंडे यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. वनखंडे सध्या भाजपच्या मिरज विधानसभा प्रमुख पदावर आहेत.
राष्ट्रवादी, शिवसेनेतील फेरमांडणीनंतर…
आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे शिवसेनेतील दोन्ही गट मिरजेत आहेत. शिंदे गट भाजपसोबत असला तरी भाजपशी त्यांचे फार जवळीक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट व अजित पवार गट मिरजेत आहेत. शरद पवार गटाचे प्राबल्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे मिरजेत अधिक आहे. अजित पवार गटाचे मात्र नगण्य आहे. सध्या भाजप बरोबर अजित पवार गट आहे. त्यामुळे अन्य मित्र पक्षांपेक्षा येथे भाजपचा उमेदवार असेल, हे मात्र नक्की.
एकास एक उमेदवार दिला तरच…
सध्या मिरजेमध्ये भाजपची ताकद आहे. शिवाय खाडे पालकमंत्री आहेत. त्यामुळे अशा बलाढ्य उमेदवाराला पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन एकास एक उमेदवार दिला तरच त्यांची लढत चुरशीची होऊ शकते, यात तीळ मात्र शंका नाही.
2019 कडे पाहताना…
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये खाडे यांना 96 हजार 369 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी होनमोरे यांच्यापेक्षा खाडे यांना तीस हजार 398 मते जास्त मिळाली होती.

The post मिरज विधानसभेसाठी इच्छुकांचा शड्डू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source