तामिळनाडूत मुसळधार पावसाने घेतले तीन बळी, ४ जिल्‍ह्यांत यलो अलर्ट

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडू राज्‍यातील चार जिल्‍ह्यांमध्‍ये रविवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून, या नैसर्गिक आपत्तीत विविध घटनांमध्‍ये तिघांचा मृत्‍यू झालाआहे. दरम्‍यान, आज ( दि. १९) चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.राज्यपाल आरएन रवी आढावा बैठक घेणार आहेत. चार जिल्‍ह्यांमध्‍ये यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील सर्वात जास्त प्रभावित असलेल्या कन्याकुमारी, … The post तामिळनाडूत मुसळधार पावसाने घेतले तीन बळी, ४ जिल्‍ह्यांत यलो अलर्ट appeared first on पुढारी.

तामिळनाडूत मुसळधार पावसाने घेतले तीन बळी, ४ जिल्‍ह्यांत यलो अलर्ट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : तामिळनाडू राज्‍यातील चार जिल्‍ह्यांमध्‍ये रविवारी रात्रीपासून पावसाने थैमान घातले असून, या नैसर्गिक आपत्तीत विविध घटनांमध्‍ये तिघांचा मृत्‍यू झालाआहे. दरम्‍यान, आज ( दि. १९) चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.राज्यपाल आरएन रवी आढावा बैठक घेणार आहेत.
चार जिल्‍ह्यांमध्‍ये यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील सर्वात जास्त प्रभावित असलेल्या कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्‍ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्‍य तिघे बेपत्ता आहेत. उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्‍ये आज हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दक्षिण तामिळनाडूमधील तब्बल 39 प्रदेशांमध्ये अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाने स्‍पष्‍टकेले आहे.
अनेक भागातील रस्‍त्‍यांचा संपर्क तुटला
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेती, रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले असून अनेक निवासी वसाहती पाण्याखाली आल्या आहेत. तलावांना तडे गेल्याने आणि पूर आल्याने अनेक भागातील रस्‍त्‍यांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी मोबाईल फोन सेवाही विस्‍कळीत झाली आहे.
वादळी वारे वाहण्याची शक्यता
हवामान विभागाने म्‍हटले आहे की, प्रतितास ५५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाने दक्षिण तमिळनाडू किनारपट्टी, मन्नारच्या आखात, कोमोरिन परिसर, लक्षद्वीप परिसरात वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्राला लागून असणार्‍या ठिकाणी मच्छीमारांनी आजच्या दिवसासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

#WATCH | Thoothukudi, Tamil Nadu: Floods in various parts of the city as heavy rainfall continues to impact life and property. pic.twitter.com/9csZlFFA9N
— ANI (@ANI) December 19, 2023

Heavy rainfall in the Southern District of Tamil Nadu impacted train operations. Southern Railway is making concerted efforts to restorative of traffic & evacuation of stranded passengers at Srivakuntam Railway station: Southern Railway pic.twitter.com/U7Gjb13pze
— ANI (@ANI) December 19, 2023

हेही वाचा : 

China Earthquake : भुकंपाने चीनमध्ये हाहाकार; १११ मृत्यूमुखी, २३० हून अधिक जखमी
दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात
Isreal Hamas War : गाझात सापडला हमासचा सर्वात मोठा बोगदा; निवारागृहे अनेक चैनीच्या वस्तूंसह सॅटेलाईट फोनचीही सुविधा

 
 
The post तामिळनाडूत मुसळधार पावसाने घेतले तीन बळी, ४ जिल्‍ह्यांत यलो अलर्ट appeared first on Bharat Live News Media.

Go to Source