पुणे : बोगस दस्तनोंदणीप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश

पुणे : बोगस दस्तनोंदणीप्रकरणी दैनिक ‘पुढारी’ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बोगस दस्त नोंदणी करणा-यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.  जमिनीची खरेदी-विक्री करताना शासनाच्या विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. मात्र, पुणे शहर आणि जिल्ह्यात जमिनीचे व्यवहार करताना माननीयांनी शेकडो बोगस खरेदीखत केल्याचा प्रकार ’पुढारी’ ने उघडकीस आणला. खरेदीखत करत … The post पुणे : बोगस दस्तनोंदणीप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश appeared first on पुढारी.

पुणे : बोगस दस्तनोंदणीप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश

पुणे : बोगस दस्तनोंदणीप्रकरणी दैनिक ‘Bharat Live News Media’ने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. बोगस दस्त नोंदणी करणा-यांविरोधात तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.  जमिनीची खरेदी-विक्री करताना शासनाच्या विविध परवानग्या घेणे आवश्यक असते. मात्र, पुणे शहर आणि जिल्ह्यात जमिनीचे व्यवहार करताना माननीयांनी शेकडो बोगस खरेदीखत केल्याचा प्रकार ’Bharat Live News Media’ ने उघडकीस आणला.

खरेदीखत करत असताना बोगस ऑर्डर वापरण्यात आलेल्या आहेत. शहरातील फुरसुंगी, लोहगाव, खराडी, वाघोली यांसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दस्त नोंदवत असताना वापरण्यात आलेली एनए ऑर्डर शासनाने दिलेली नसताना दस्तांची नोंदणी करण्यात  आलेली आहे. याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तातडीने सर्व दुय्यम निबंधक यांनी यापुढे तहसीलदार हवेली पुणे कार्यक्षेत्रातील किंवा अन्य तहसीलदार यांच्याकडील सनद परवानगीच्या आधारे दस्त नोंदणी करावयाची असेल, तर संबंधित तहसीलदार यांच्याकडील पडताळणी अभिप्राय घेऊनच दस्त नोंदणीबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आहेत.
बडे मासे गळाला लागणार ?
अधिकार्‍यांच्या संगनमताने बोगस खरेदीखताचे रॅकेट चालते ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. करोडो रुपयांचे व्यवहार करीत असताना बोगस कागदपत्रे जोडण्यात आलेली आहेत. यामध्ये आणखी काही प्रकरणे पुढे येतील. यामध्ये अनेक राजकीय मंडळींचाही सहभाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजून यामध्ये किती प्रकरणे पुढे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुद्रांक जिल्हाधिकार्‍यांकडे या संदर्भात आम्ही आवाज उठविला. याप्रकरणी त्यांनी लक्ष घालून तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा आहे. शासनाची फसवणूक होत असेल, तर त्यासंदर्भात चौकशी समिती नेमून सर्वप्रकारचे दस्त तपासावेत.

   – रोहन सुरवसे पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ता.

हेही वाचा

दाऊद टोळीतील गुंड सलीम कुत्ता सहा वर्षांपासून येरवडा कारागृहात
प्रतिनियुक्तीमुळे दस्तनोंदणी विभागात अधिकार्‍यांच्या पदोन्नती रखडल्या
हिवाळ्यात कमी पाणी पिताय?; जाणून घ्‍या शरीरावर काय दुष्‍परिणाम होतील

The post पुणे : बोगस दस्तनोंदणीप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश appeared first on Bharat Live News Media.

Go to Source