भूकंपाने चीनमध्ये हाहाकार; १११ मृत्यूमुखी, २३० हून अधिक जखमी
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चीनच्या गान्सू प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. चीनमधील भूकंपात १११ लोक मृत्यूमुखी पडले असून २३० हून अधिक जखमी झाले आहेत. त्यामुळे चीनमध्ये हाहाकार उडाला. या भूकंपाची तीव्रता ६.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे.
आज सकाळी चीनमध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे चीनमधील सरकारची धांदल उडाली आहे. या भूकंपात आतापर्यंत १११ लोकांचा मृत्यू आणि २३० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा भूकंप ३५ किमी खोलीवर झाला असून त्याचा केंद्रबिंदू गान्सूची प्रांतीय राजधानी शहर, लान्झोऊच्या पश्चिम-नैऋत्येला १०२ किमी अंतरावर आहे.
गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सांगितले की, भूकंपाची तीव्रता इतकी होती की अनेक इमारती कोसळल्या. भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झाले आहे. येथे अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.
STORY | Midnight earthquake kills 111 in China
READ: https://t.co/8LGp3cZ8TX#ChinaEarthquake pic.twitter.com/AQ7SMV8x6S
— Press Trust of India (@PTI_News) December 19, 2023
हेही वाचा :
Isreal Hamas War : गाझात सापडला हमासचा सर्वात मोठा बोगदा
विष प्रयोग की गंभीर आजार? : दाऊदचा सस्पेन्स कायम
तामिळनाडूत मुसळधार पावसाने घेतले तीन बळी, ४ जिल्ह्यांत यलो अलर्ट
The post भूकंपाने चीनमध्ये हाहाकार; १११ मृत्यूमुखी, २३० हून अधिक जखमी appeared first on Bharat Live News Media.