आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

  The post आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on पुढारी.

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

मेष

मेष : इतरांवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नका, त्याचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो. प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा.

वृषभ

वृषभ : ध्यानधारणा आराम मिळवून देईल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

मिथुन

मिथुन : स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा होईल, तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.

कर्क

कर्क : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा. आजच्या दिवशी मित्रांपासून सावध राहा.

सिंह

सिंह : तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ शकता. तथापि, स्थिती लवकरच सुधारेल. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ काढा.

कन्या

कन्या : नवीन मित्र जोडाल. संध्याकाळी प्रेमोत्सुक व्हाल. नवीन उपक्रम आकर्षक परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल.

तुळ

तुळ : कामाच्या धबडग्यात मधूनच थोडा आराम करा, विश्रांती घ्या. रात्रीची जागरणे टाळा. येणी वसूल होतील.

वृश्चिक

वृश्चिक : मादक पदार्थांचे सेवन करू नका. किमती वस्तू हरवू शकतात. घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही.

 
धनु

धनु : आरोग्याच्या द़ृष्टीने अतिशय चांगला दिवस. उल्हासित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणांस आत्मविश्वास मिळवून देईल.

मकर

मकर : एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यावर काही गुंतवणूक केली असेल तर आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

कुंभ

कुंभ : प्रेम जीवनात नवीन वळण येईल. साथीदार आज तुमच्याशी विवाहाची बोलणी करू शकतो. यावर विचार केला पाहिजे.

मीन

मीन : अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती पूर्ण सत्य सांगणार नाही.

The post आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? appeared first on Bharat Live News Media.

Go to Source