कोरियन पर्यटक तरुणीशी महाराष्ट्रात छेडछाड; भररस्त्यावर घडला लाजीरवाणा प्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियातील एका पर्यटक तरुणीशी छेडछाड करण्याचा प्रकार राज्यात घडला आहे. या लाजीरवाण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही घटना राज्यातील असून नेमके ठिकाण कळू शकलेले नाही. या कोरियन तरुणीचे नाव केली असे आहे. ती व्हॉल्गर असून तिच्या भटकंतीचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर … The post कोरियन पर्यटक तरुणीशी महाराष्ट्रात छेडछाड; भररस्त्यावर घडला लाजीरवाणा प्रकार appeared first on पुढारी.

कोरियन पर्यटक तरुणीशी महाराष्ट्रात छेडछाड; भररस्त्यावर घडला लाजीरवाणा प्रकार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : दक्षिण कोरियातील एका पर्यटक तरुणीशी छेडछाड करण्याचा प्रकार राज्यात घडला आहे. या लाजीरवाण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ही घटना राज्यातील असून नेमके ठिकाण कळू शकलेले नाही.
या कोरियन तरुणीचे नाव केली असे आहे. ती व्हॉल्गर असून तिच्या भटकंतीचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या व्हिडिओत छेडछाडीचा हा प्रकार रेकॉर्ड झाला आहे.

🇮🇳Korean Vlogger Kelly Got Harassed In India pic.twitter.com/u1i7jCPhxu
— Anand Tate (@anandtatepajeet) December 15, 2023

केली या व्हिडिओत काही स्थानिकांशी बोलताना आणि त्यांच्याशी फोटो घेत असताना दिसते. ती एका व्यापाऱ्यासोबत फोटो घेत असतान दुसरा एक युवक मध्येच आला आणि तिला मिठी मारली. या युवक बाजूच्या व्यक्तीला सांगत होता की फक्त तिच्या बाजूला उभे राहू नको, तिला अशी मिठी मार. केली या युवकाला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तरीही या युवक तिला मिठी मारताना दिसतो. केलीने या घटनेची माहिती पोलिसांत दिली आहे का नाही, याची माहिती उपलब्ध नाही. पण एक्सवर अनेक भारतीयांनी केलीची माफीही मागितली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी खारमध्ये एका कोरियन तरुणीसोबत असाच प्रकार घडला होता. यात दोन युवकांना अटकही झाली होती.
हेही वाचा 

मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला बेड्या
भंडारा: ९ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक
Thane News : ठाण्यात रोज दोन विनयभंग, एक बलात्काराचा गुन्हा

The post कोरियन पर्यटक तरुणीशी महाराष्ट्रात छेडछाड; भररस्त्यावर घडला लाजीरवाणा प्रकार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source