परभणी: गंगाखेड येथे जरांगे- पाटलांची सभा; मुस्लिम समाज उचलणार मोठी जबाबदारी

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची सभा गंगाखेड शहरात शुक्रवारी (दि.२२) होत आहे. यानिमित्ताने शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी एक पाऊल पुढे टाकत सामाजिक ऐक्यतेचा नारा दिला आहे. सभेसाठी शहरात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्याची जबाबदारी पार पडण्याचा निर्धार मुस्लिम समाजाने बैठकीत जाहीर केला. मुस्लिम समाजाची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवारी सायंकाळी पार … The post परभणी: गंगाखेड येथे जरांगे- पाटलांची सभा; मुस्लिम समाज उचलणार मोठी जबाबदारी appeared first on पुढारी.

परभणी: गंगाखेड येथे जरांगे- पाटलांची सभा; मुस्लिम समाज उचलणार मोठी जबाबदारी

गंगाखेड, Bharat Live News Media वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची सभा गंगाखेड शहरात शुक्रवारी (दि.२२) होत आहे. यानिमित्ताने शहरातील मुस्लिम समाजबांधवांनी एक पाऊल पुढे टाकत सामाजिक ऐक्यतेचा नारा दिला आहे. सभेसाठी शहरात येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्याची जबाबदारी पार पडण्याचा निर्धार मुस्लिम समाजाने बैठकीत जाहीर केला.
मुस्लिम समाजाची बैठक शहरातील शासकीय विश्रामगृहात रविवारी सायंकाळी पार पडली. या बैठकीत शुक्रवारी दुपारी ४ वाजता शहरातील नवीन मार्केट कमिटी यार्डात होणाऱ्या सभेसाठी येणाऱ्या वाहनांचे पार्किंग करण्याची जबाबदारी मुस्लिम समाजाने करण्याचा निर्धार केला. यासाठी व्यापक बैठक व नियोजन करण्यात आले आहे. शहरात सभेसाठी येणाऱ्या मराठा समाजा बांधवांना तसेच शहरवासीयांना गर्दीमुळे कुठलीही अडचण होऊ नये, याकरिता वाहतूक समस्या सोडविण्याची जबाबदारी मुस्लिम समाज बांधवांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. सामाजिक ऐक्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांचा हा निर्णय गौरवास्पद ठरला आहे. या निर्णयाचे मराठा समाज बांधवांसह शहर, तालुका व जिल्ह्यातून स्वागत होत आहे.
हेही वाचा 

परभणी: सोनपेठ येथे शुक्रवारी मनोज जरांगे- पाटील यांची सभा
Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही : मनोज जरांगे- पाटील
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर सरकारने लेखी दिलेल्या आश्वासनावर काय कार्यवाही केली: मनोज जरांगे- पाटील

The post परभणी: गंगाखेड येथे जरांगे- पाटलांची सभा; मुस्लिम समाज उचलणार मोठी जबाबदारी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source